15 November 2024 4:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

लोकांनी ठरवलंय, ५० खोके घेतलेल्यांच्या गाडीतून जायचं आणि मुंबईला उतरल्यानंतर शिवतीर्थावर जायचं - आ. भास्कर जाधव

MLA Bhaskar Jadhav

Shivsena MLA Bhaskar Jadhav | दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खाजगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे 10 कोटी रुपये रोख भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले असे वृत्त माध्यमांमधून समजते. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली? त्यांना हा पैसा कोणी दिला? एवढ्या मोठ्या रकमेचा रोख व्यवहार करता येतो का? ही मनीलॉँडरिंग नाही का ? यासह मेळाव्यासाठी झालेल्या संपूर्ण खर्चाची ईडी व आयकर विभागाकडून चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

आमदार भास्कर जाधव काय म्हणाले :
दुसरीकडे, याच मुद्द्यावर बोलताना भास्कर जाधवांनी विधान केलं. माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “1800 गाड्या बुक केल्या, त्यांना पैसे भरावे लागतातच. ज्यांना सुरतला जाण्यासाठी, गुवाहाटीला जाण्यासाठी पैशांची कमतरता पडली नाही. त्यांना महाराष्ट्रातल्या एसटी महामंडळाला भरण्यासाठी पैसे कसे कमी पडतील?”, असा प्रश्न भास्कर जाधवांनी उपस्थित केलाय.

त्यांनी जेव्हा शिवसेनेशी विश्वासघात केला. तेव्हा ५० खोके एकदम ओके, अशी घोषणा महाराष्ट्रात आणि देशात गाजलीये. त्यांनी कितीही गाड्या करू द्या. कितीही घोषणा करू द्या. महाराष्टातल्या जनतेनं हे ठरवलं आहे की, ज्याने ५० खोके घेतले आहेत, विश्वासघाताने घेतलेले असल्यानं त्यांच्यांच गाडीतून जायचं आणि मुंबईला उतरल्यानंतर शिवतीर्थावर जायचं. कारण ज्यांनी विश्वासघात केलाय त्यांची थोडीफार फसवणूक केली, तर त्याला विश्वासघात म्हणता येणार नाही”, असं भास्कर जाधव म्हणालेत.

शिंदे गटाने कार्यकर्त्यांच्या प्रवासाबद्दल केलेल्या व्यवस्थेविषयी बोलताना भास्कर जाधवांनी शिवसैनिक शिंदे गटाच्या वाहनातून येतील, पण उद्धव ठाकरेंच्या सभेला उपस्थित राहतील असं म्हटलंय. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं प्लानिंग नेमकं काय झालंय? असा प्रश्न या विधानामुळे झालाय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena MLA Bhaskar Jadhav reaction on Dasara Melava check details 04 October 2022.

हॅशटॅग्स

#MLA Bhaskar Jadhav(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x