22 December 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत - आ. प्रताप सरनाईक

Shivsena MLA Pratap Sarnaik, BJP leaders, Ramleela permission, Lockdown

मुंबई, १६ ऑक्टोबर : भाविकांना दर्शनासाठी मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आली होती. लॉकडाऊन शिथील करण्याच्या प्रक्रियेत राज्यभरात दारुच्या दुकानांना अधिकृत परवानग्या देण्यात आल्या. मात्र मंदिरांचं टाळं काही उघडलं नाही, असा आरोप भाजपने केला होता. या आंदोलनात भाजपसह विश्व हिंदू परिषदही सहभागी होती.

त्यानंतर आता भाजपनं रामलीला आयोजनाच्या परवानगीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. राज्यातील मदरसे बंद करण्याच्या मागणी करणारे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आता रामलीला आयोजनास परवानगी देण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

रामलीला आयोजनास मुभा देण्याची मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ‘राज्यात रामलीलेची मोठी परंपरा आहे. कोरोना काळात रामलीला अतिशय सहज आयोजित केली जाऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली नाही. मग आता किमान रामलीला आयोजनास तरी परवानगी द्यावी,’ असं भातखळकर म्हणाले.

रामलीला आयोजनासाठी परवानगी मागणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून काही जण रामाच्या नावानं राजकारण करत आहेत. आजही ती मंडळी मतं मागण्यासाठी तेच राजकारण करत आहेत. एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली आहे. मात्र तरीही अशा मागण्या केल्या जात आहेत. कोरोना संकट संपताच मुख्यमंत्री स्वत: सगळी धार्मिकस्थळं सुरू करतील,’ असं सरनाईक म्हणाले.

 

News English Summary: Shiv Sena MLA Pratap Saranaik has given a strong reply seeking permission to organize Ramli. ‘Some people have been doing politics in the name of Rama for the last several years. Even today, those churches are doing the same politics to get votes. On the one hand, there is the corona crisis in the state. Prime Minister Narendra Modi has also taken notice of it. But such demands are still being made. As soon as the Corona crisis ends, the Chief Minister himself will start all the religious places, ‘said Saranaik.

News English Title: Shivsena MLA Pratap Sarnaik slams BJP leaders for asking Ramleela permission from Thackeray government news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x