24 January 2025 2:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

शिवसेनेचे आमदार उद्या जयपूरला रवाना होण्याची शक्यता

Shivsena, Shivsena MLAs

मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र आमदारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काँग्रेसची सत्ता असलेलं राज्य जाणीवपूर्वक निवडण्यात आल्याचं वृत्त आहे. भारतीय जनता पक्ष आजही घोडेबाजार करेल अशी आघाडीला आणि शिवसेनेला शंका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेलं राज्य शिवसेनेने निवडलं नाही असं समजतं.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्रातील आमदार देखील जयपूरमध्येच वास्तव्यास ठेवण्यात आले होते. तत्पूर्वी कर्नाटकातील सत्तापालटवेळी देखील भारतीय जनता पक्षाने सुरक्षेचा उपाय म्हणून भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेलं महाराष्ट्र राज्य आमदारांच्या लपवालपवीसाठी निवडलं होतं. त्यामुळे सध्या काँग्रेससोबतच सत्ता येणार असल्याने शिवसेनेने काँग्रेसची सत्ता असलेलं राजस्थान आमदारांसाठी निवडलं असून, त्यासाठी जयपूरची निवड करण्यात आल्याचं वृत्त आहे.

शिवसेनेत उद्या या घडामोडी घडत असताना दुसऱ्याबाजूला उद्याच काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत काँग्रेसचा विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. दिल्लीपाठोपाठ आता मुंबईतही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. काँग्रेस-एनसीपी’च्या बैठका सुरू असताना शिवसेनेच्या गोटातही वेगानं घडामोडींना घडत आहेत.

शिवसेनेच्या आमदारांना उद्या मुंबईत बोलवण्यात आले आहे. उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर या सर्व आमदारांना मुंबईहून जयपूरला रवाना करण्यात येणार आहे. उद्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर हे सर्व आमदार जयपूरला रवाना होणार आहेत. मात्र शिवसेना आमदारांची गोव्याला जाण्याची इच्छा असल्याचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले आहे.

नव्या महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ पडणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, तर बाळासाहेब थोरात आणि एनसीपी’चे अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, एनसीपी’ला अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं, यासाठी अजित पवार आग्रह करत असल्याचं वृत्त आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x