22 January 2025 9:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

उद्धव ठाकरे ५ वर्ष नेतृत्त्व करणार, मग कशाला राजकीय खेळ करायचे - संजय राऊत

CM Uddhav Thackeray, MLC Election, MP Sanjay Raut

मुंबई, १ मे: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कितीही मतभेद असले तरी येथील राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्याचे कळते. सुरक्षित वावर आणि इतर सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल असं म्हटलं जातं.

(ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र या निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री उशिरा मोदी, शहा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राज्यपालनियुक्त जागेचा विचार सोडून विधान परिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका हाच मार्ग असल्याने या दिशेने हालचाली सुरू झाल्याचे कळते.

दरम्यान यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात करोनामुळे चिंतेचं वातावरण असताना त्यात अशी अस्थिरता निर्माण होता कामा नये. उद्धव ठाकरेंना निवडून येण्यात कोणतीही अडचण नव्हती. पण करोनाच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. याचं कोणीही राजकारण करु नये”.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. आज एक नवा अध्याय सुरु होत आहे. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातच पाच वर्ष राहणार आहे. मग कशाला राजकीय खेळ करायचे. निवडणूक आयोगाने राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी हा शिवसंकेत आणि शुभनिर्णय आहे”.

 

News English Summary: Reacting, MP Sanjay Raut said, “The Election Commission’s decision has put an end to efforts to create political instability. Such instability should not be created in the state when there is an atmosphere of concern due to corona. Uddhav Thackeray had no problem getting elected. But the Corona crisis pushed the election forward. No one should politicize this ”.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut election commission Chief Minister Uddhav Thackeray legislative council elections News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x