23 February 2025 10:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, राऊतांकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Shivsena MP Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, News Latest Updates

मुंबई, २७ जुलै: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, आपण आमच्या आयुष्यात खास आहात. आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. देशाचं नेतृत्त्व करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

तत्पूर्वी, या वाढदिवसानिमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक फोटो ट्वीट करून अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच गाडीत बसले आहेत आणि या गाडीचं स्टिअरिंग अजित पवारांच्या हातात आहे. हा फोटो सध्या घडणाऱ्या घ़डामोडींच्या पार्श्वभूमीवर खूपकाही सांगून जाणारा आहे. या अनोख्या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा स्टिअरिंग नक्की कुणाच्या हातात आहे? अशी दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

News English Summary: Shivsena MP Sanjay Raut tweeted that you are special in our lives. Happy birthday to you We have the ability to lead the country, said Sanjay Raut.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut give birthday wishes to Chief Minister Uddhav Thackeray News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x