22 December 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

फडणवीस आणि संजय राऊतांची भेट | पण भूकंप शरद पवारच घडवतील - सविस्तर वृत्त

Shivsena MP Sanjay Raut, Devendra Fadnavis, Mahavikas Aghadi, Meeting

मुंबई, 26 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. TV9 मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे. मात्र सदर भेट सामनाच्या मुलाखतीसंदर्भात असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल आला खरंतर महायुतीच्या बाजूने आला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगला आणि शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. तसंच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली.

महाविकास आघाडी झाली असली तरी खऱ्या अर्थाने शिवसेना आणि राष्ट्रवादीचं एकमेकांच्यासोबत असून काँग्रेस पक्ष त्यात नामधारी सहकारी म्हणून आहे. राज्यातील सत्ताकारणापासून लांब गेले तर राज्यातील उरली सुरली काँग्रेस देखील समाप्त होईल याची राज्यातील काँग्रेस नेत्यांना चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेत काही सुरु आहे असं गृहीत धरलं तरी ते शरद पवारांच्या आशिर्वादाशिवाय अशक्य असल्याचं राजकीय विश्लेषक मानतात. त्यामुळे आजची संजय राऊत आणि फडणवीसांची भेट देखील शरद पवारांना पूर्व कल्पना देऊनच झालं असण्याची अधिक शक्यता आहे. अर्थात त्या बैठकीचा अर्थ राज्यात राजकीय उलथापालत असं समजण्याची काहीच गरज नाही.

कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकार जसं शरद पवारांनी पुढाकार घेऊन स्थापन केलं तसं ते ५ वर्ष टिकवणं किंवा पाडणं देखील पवारांच्या हातीच आहे. दुसरीकडे दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड रोष असून ते एकवेळ सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादीशी बैठका घेतील पण शिवसेनेसोबत नाही अशीच शक्यता अधिक आहे. आणि याची कल्पना शिवसेनेला देखील असल्याने उद्धव ठाकरेंपासून इतर सर्वच नेते शरद पवारांसोबत जवळीक साधून आहेत आणि त्यांना अंधारात ठेऊन कोणताही निर्णय घेत नाहीत हे मागील काही दिवसांपासून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राऊत आणि फडणवीस यांच्या अजून कितीही बैठका झाल्या तरी राजकीय भूकंप मात्र शरद पवारच करतील ज्याची सध्या तरी गरज असल्याचं दिसत नाही असं राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे

 

News English Summary: Former Maharashtra chief minister Devendra Fadnavis and Shiv Sena MP Sanjay Raut met here on Saturday, prompting speculation in Maharashtra’s political circles. Raut, who hogged media limelight for his strident anti-BJP posture over power sharing formula after last year’s state Assembly polls, met Fadnavis at a suburban hotel here. Maharashtra BJP chief spokesperson Keshav Upadhye said there was no political angle to the meeting. “Raut wanted to interview Fadnavis for (the Sena mouthpiece) Saamana and this meeting was to discuss how to go about it,” he tweeted.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut meeting with Devendra Fadnavis Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x