26 December 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनी बाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांकडून रेटिंग सह टार्गेट प्राईस अपडेट - NSE: SUZLON SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP
x

बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत | राऊतांचं प्रतिउत्तर

Shivsena MP Sanjay Raut, Kangana Ranaut, Babar Sena, Marathi News ABP Maza

मुंबई, 9 सप्टेंबर: मागील काही दिवसांपासून राज्यात कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद पाहायला मिळत आहे. अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस आणि मुंबईविषयी केलेल्या वक्तव्यावरून ही ठिणगी पडली होती. त्यानंतर आज कंगना रणौतच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामाच्या कारणावरून मनपानं हातोडा चालवला. त्यामुळे संतप्त झालेल्या कंगनानं शिवसेनेला बाबरची सेना संबोधलं. कंगनाच्या या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाच्या कार्यालयावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. ही सरकारची कारवाई आहे. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. कंगनाने शिवसेनाला बाबराची सेना म्हटले आहे. यावर राऊत यांनी बाबरी तोडणारे आम्हीच आहोत. ती आम्हाला काय म्हणतेय? कंगनाच्या ऑफिसवरील कारवाईचे टायमिंगबाबतचे उत्तर केवळ मुंबई महापालिकेचे आयुक्त देऊ शकतात. जर कोणी कायदा मोडत असेल तर त्यावर कारवाई केली जाते. अशावेळी पक्षाकडे माहिती असणे गरजेचे नाही, असे सांगितले.

कंगनानं केलेल्या बाबर सेना उल्लेखावरून संजय राऊत यांनी सुनावलं. राऊत म्हणाले,”बाबरी तोडणारे लोक आम्हीच आहोत. मग आम्हाला काय म्हणत आहे. कंगना रणौतशी माझं वैर नाहीये. ती एक कलाकार आहे. मुंबईत राहते. पण ज्या प्रकारची भाषा तिने मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांबद्दल वापरली आहे. ती कदापि सहन करण्यासारखी नाही. कंगनानं जर आपलं म्हणणं मागे घेतलं, तर वाद राहणारच नाही,” असं संजय राऊत म्हणाले.

 

News English Summary: Sanjay Raut narrated from Kangana’s mention of Babar Sena. Raut said, “We are the ones who are breaking the Babri.” Then what is telling us. I do not hate Kangana Ranaut. She is an artist. Lives in Mumbai. But the kind of language she has used about Mumbai and Maharashtra police.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut Reaction On Kangana Ranaut Comment Of Babar Sena Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x