23 February 2025 10:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपचे १०५ आमदार निवडून येण्यामागे शिवसेनेचं सुद्धा योगदान होतं - शरद पवार

Shivsena MP Sanjay Raut, NCP Chief Sharad Pawar, interview

मुंबई, ९ जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.

पण यात काही मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपचा जो १०५ आकडा आहे त्यात शिवसेनेचं पण योगदान होतं, मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही, तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले

शरद पवारांची ही मुलाखत ११ ते १३ तारखेदरम्यान प्रसिद्ध होणार असून एक शरद, सगळे गारद या टायटलने ही मुलाखत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मात्र मुलाखतीबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील काही भाग टिझरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

 

News English Summary: Sanjay Raut’s tough questions and Sharad Pawar’s heartfelt answers are being seen. But speaking on some issues, Sharad Pawar said that Shiv Sena also contributed to the 105 number of BJP

News English Title: Shivsena MP Sanjay Raut shared another promo of NCP Chief Sharad Pawar interview News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x