21 April 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

शेतकरी आंदोलनात चीन- पाकिस्तानचा हात असल्यास केंद्राने सर्जिकल स्ट्राईक करावा

Shivsena MP Sanjay Raut, BJP MP Raosaheb Danve, Controversial statement, Protesting farmers

मुंबई, १० डिसेंबर: “हे आंदोलन चालू आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल”. एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?,” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं.

यावर विविध पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे (BJP MP Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून पुरावे देण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर केंद्रानं सर्जिकल स्ट्राईक करावा असं आवाहनही केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले आहेत.

तत्पूर्वी “रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू (MahaVikas Aghadi minister Bacchu kadu) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे (BJP MP Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

 

News English Summary: Shivsena MP Sanjay Raut has reacted to a statement made by Union Minister of State and Bharatiya Janata Party MP Raosaheb Danve and demanded proof. Not only that, the Center has also called for a surgical strike. He was talking to reporters in Mumbai.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut slams BJP MP Raosaheb Danve over controversial statement against protesting farmers news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या