19 April 2025 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

साँप तो युही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं! नागपंचमीच्या शुभेच्छा - संजय राऊत

Shivsena MP Sanjay Raut, Tweet On Nagpanchmi

मुंबई, २५ जुलै : श्रावणातला पहिला सण नागपंचमी. पण यंदाच्या नागपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. शेकडो वर्षांची पंरपरा जपण्यासाठी फक्त मानाच्या पालखीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच आज शिराळा मधील अंबामात मंदिर बंद ठेवण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरामध्ये फक्त ५ लोकांना पूजेसाठी तर पालखी सोहळ्यासाठी १० लोकांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूमुळे नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा खंडीत झाली आहे. याबाबतची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजिती चौधरी यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे यावर्षी नागपंचमीचा सण खास ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्या नागपंचमीदिवशी शिवयोग बनला आहे. हा योग तब्बल वीस वर्षांनंतर बनला असल्याची माहिती ज्योतिषतज्ज्ञांनी दिली आहे. यापूर्वी असा योग इस २००० मध्ये बनला होता. दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आणि नेते संजय राऊत यांनी एकदम वेगळया पद्धतीने नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘साँप तो युही बदनाम है, मुझे तो लोग डसते हैं!’ नागपंचमीच्या शुभेच्छा अस संजय राऊत यांनी त्यांच्या टि्वटरवरील संदेशात म्हटले आहे. त्यांचे हे टि्वट चर्चेचा विषय ठरले आहे.

आजच संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत प्रदर्शित झाली आहे. एकूण दोन भागांमध्ये ही मुलाखत आहे. त्यातील पहिला भाग आज प्रदर्शित झाला आहे. उद्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित होईल.

 

News English Summary: Shiv Sena Rajya Sabha MP and leader Sanjay Raut has wished Nagpanchami in a very different way. The snake is so infamous, people bite me! Happy Nagpanchami, said Sanjay Raut in his Twitter message.

News English Title: Shivsena MP Sanjay Raut Tweet On Nagpanchmi News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या