उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा आंदोलन पंतप्रधानांच्या घरासमोर करायला हवं होतं

मुंबई, १९ नोव्हेंबर: ‘गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारच्या आदेशानुसारच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं बंद होती. त्यामुळं भारतीय जनता पक्षामधील उपऱ्या व नाच्या हिंदुत्ववाद्यांनी मंदिरे उघडा असं आंदोलन पंतप्रधान मोदी यांच्या घरासमोरच करायला हवं होतं. पण, ते महाराष्ट्रात ढोल-ताशे वाजवून बिनबुडाचे राजकारण करत आहेत. यातून महाराष्ट्राचं नुकसान होत आहे,’ अशी खरमरीत टीका शिवसेनेनं केली आहे.
राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतल्यापासून नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आमच्या दबावामुळंच सरकारनं हा निर्णय घेतल्याचं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे. भारतीय जनता पक्षाचे राम कदम, प्रवीण दरेकर यांसारख्या काही नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन याचा आनंद साजरा केला. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘भारतीय जनता पक्षाला नक्की काय झालं आहे? महाराष्ट्रातील त्या पक्षाचं डोकं सरकलं आहे का? असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
तर बाटग्यांनी हिंदुत्वावर बोलावे किंवा सल्ले द्यावेत हा विनोदच म्हणावा लागेल. कुणीतरी एक बोगस ‘आचार्य’ पुढे करून मंदिरांचे टाळे उघडा यासाठी आंदोलन केले. कोण कुठले हे आचार्य? पण भारतीय जनता पक्षाला फुकटात नाचायला लोक मिळतात. ते भाडय़ाने वापरून महाराष्ट्र सरकारच्या नावाने शिमगा करायचा हा त्यांचा रिकाम्या वेळेतला उद्योग झाला आहे. एका वृत्तवाहिनीचा ‘भुंकरा’ अँकर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, ज्येष्ठ नेत्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करतो. त्या ‘भुंकऱ्या’स सोडविण्यासाठी पवित्र न्यायमंदिरांचा ‘बाजार’ करणाऱ्यांना मंदिरे उघडल्याचे श्रेय लाटायचे आहे. अशा लोकांविषयी काय लिहायचे व काय बोलायचे? देवदेवतांनो, त्यांना सुबुद्धी द्या असे म्हणण्याचीही सोय नाही. भारतीय जनता पक्षातील या उपऱ्या हिंदुत्ववाद्यांचे ढोंग जनताच उघडे पाडेल. त्यांच्या मानेवर रिकामी मडकी आहेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
News English Summary: A new political controversy has started since the Thackeray government decided to open a temple in the state. The BJP says that the government took this decision due to our pressure. Some leaders of Bharatiya Janata Party like Ram Kadam, Praveen Darekar went to the temples and celebrated. Shiv Sena has fired at these leaders from the front page of ‘Saamana’. ‘What exactly has happened to the Bharatiya Janata Party? Has the head of that party in Maharashtra shifted? Shiv Sena has hit such a toll.
News English Title: Shivsena party attack BJP leaders over get credit temple reopening state News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO