22 January 2025 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

पंतप्रधान मोदींना देखील देश फिरण्यास सांगावे | राऊतांच भाजपाला प्रतिउत्तर

Shivsena Sanjay Raut, CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi, Marathi News ABP Maza

मुंबई, ३ सप्टेंबर : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची पद्धत एकच आहे. पंतप्रधानही कार्यालयात बसून काम करतात. मुख्यमंत्री गेल्यावर गर्दी होते. पंतप्रधान प्रोटोकॉल तोडत नाहीत, मग सीएमनी का तोडावा?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. काम होण्याशी मतलब आहे. ‘डिजिटल इंडिया’ वापरुन पीएम काम करतात, तसंच सीएमही काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही देश पालथा घालण्यास सांगावे, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी टीकाकारांना दिले.

उद्धव ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीवर टीका करणाऱ्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदींनाही अशा पद्धतीने काम न करता संपूर्ण देश पालथा घालावा असं सागण्याचं धाडस करावं असं आवाहनच संजय राऊत यांनी केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखी आहे. ज्या प्रकारे प्रादुर्भाव वाढत आहे अशा परिस्थितीत मुख्यमंत्री मुख्यमंत्री गेले तर गर्दी होते. पंतप्रधान, राष्ट्रपती प्रोटोकॉल तोडत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी का तोडावा? याचं भान जुन्या सहकाऱ्यांना नसेल तर अवघड आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

“लॉकडाऊनची भूमिका केंद्र सरकारची आहे. सरकारला काय हौस नाही हे बंद करायची. मंदिरांचे एक अर्थशास्त्र आहे. मंदिरे खुले करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भूमिका आहे. योग्य वेळी ते निर्णय घेतील. लोकांच्या जीविताशी खेळलं जावू नये, रस्त्यावर उतरुन हे संकट वाढवू नये” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

“मुंबईत काल अचानक आकडा वाढला. महाराष्ट्र आणि देशातही वाढत आहे. त्याच्यात भर पडू नये आणि लोकांच्या जीवाशी खेळ होऊ नये अशी मुख्यमंत्र्यांची भावना असेल तर भूमिका समजून घेतली पाहिजे. विरोधकांनी त्यावर मुख्यमंत्र्यांशी थेट चर्चा केली पाहिजे. रस्त्यावर उतरुन संकट वाढवू नये. लोकांच्या जीवाशी खेळू नका. संयम बाळगणं गरजेचं आहे,” असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

 

News English Summary: Chief Minister Uddhav Thackeray and Prime Minister Narendra Modi have the same approach. The Prime Minister also works sitting in the office. There was a crowd when the Chief Minister left. The Prime Minister is not breaking protocol, so why break the CM? ” This question was asked by Sanjay Raut.

News English Title: Shivsena Sanjay Raut Maharashtra CM Uddhav Thackeray Unlock Temples Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x