हा तर लोकशाहीवर सामूहिक बलात्कार | इतिहास त्यांना माफ करणार नाही
मुंबई, २ ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये आंदोलन करण्यात आलं. यावेळी योगी आदित्यनाथ यांचा पुतळाही जाळण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी योगी सरकार आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा गडचिरोली युवक काँग्रेस कडून निषेध करण्यात आलाय. युवक काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून निषेध नोंदविण्यात आला.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. ज्याप्रकारे राहुल गांधींसोबत उत्तर प्रदेशचे पोलीस वागत होते, त्यांची कॉलर पकडली, धक्काबुक्की केली, जमिनीवर पाडलं हे चित्र कोणत्याही सुसंस्कृत समाजाला आणि राजकारणाला शोभा देणारं नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर या देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाहीवरचा हा सामूहिक बलात्कार असल्याचं सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी म्हटलं की, “राहुल गांधी खासदार आहेत…सोबतच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे नातू तसंच राजीव गांधींचे पुत्र आहेत. या दोघांनीही देशासाठी बलिदान दिलं आहे. रक्त सांडलं आहे. याचा विसर जर कोणाला पडला असेल तर इतिहास त्यांना माफ करणार नाही”.
News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut on Friday drew ‘gangrape’ analogy to condemn the behaviour of Uttar Pradesh police personnel with Congress leader Rahul Gandhi who was detained along with his sister Priyanka Gandhi Vadra on the way to meet the rape victim’s family in UP’s Hathras. Raut said Rahul Gandhi is a national political leader and nobody would support this kind of police behaviour with him. He alleged that the Congress leader was caught by his collar and pushed to the ground by the cops.
News English Title: Shivsena Sanjay Raut On UP Police Congress Leader Rahul Gandhi Hathras Gangrape Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो