24 November 2024 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

हाथरसमधील बलात्कारी नटीबाईचे भाईबंद आहेत का? - शिवसेना

Shivsena, MP Sanjay Raut, hathras Gangrape, Kangana Ranaut

मुंबई, ५ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं वादंग पाहायला मिळालं. त्यावरून राजकीय वातावरणही तापलं होतं. बिहार-महाराष्ट्र, बिहार पोलीस व महाराष्ट्र पोलीस असा शाब्दिक संघर्षही बघायला मिळाला. त्यातूनच अभिनेत्री कंगना रणौतनं मुंबई पोलीस, मुंबईविषयी वादग्रस्त विधान केली आणि नव्या वादाला तोंड फुटलं होतं. अखेर सुशांत प्रकरणावरून डोकं वर काढलेल्या वादाची धूळ ‘एम्स’च्या अहवालानं खाली बसली. मात्र, हा अहवाल समोर आल्यानंतर शिवसेनेनं या प्रकरणात महाराष्ट्र, मुंबई पोलिसांवर टीका करणाऱ्यांवर संताप व्यक्त करत सवाल उपस्थित केला आहे.

हाथरस घटनेवरुन सोशल मीडियात आरोपींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या घटनेवरुन शोक आणि संताप व्यक्त केला आहे. मात्र, शिवसेना-कंगना वादानंतर प्रत्येक गोष्टीवर आपलं मत मांडणारी कंगना याप्रकरणावर गप्प का? असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात येत आहे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये! असे म्हणत शिवसेनेनं बिहार सरकारसह माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्यावरही निशाणा साधला आहे.

‘सत्य हे कधीच दडपता येत नाही. सुशांत सिंहप्रकरणी हे सत्य अखेर बाहेर आलेच आहे. याप्रकरणी ज्यांनी महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी केली, त्यांचे पुरते वस्त्रहरणच झाले आहे. सत्य आता ‘एम्स’ने बाहेर आणले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह ‘एम्स’चे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. डॉ. गुप्ता हे शिवसेनेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख नाहीत. त्यांचा मुंबईशीही तसा संबंध दिसत नाही. डॉ. गुप्ता हे ‘एम्स’च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. याच ‘एम्स’मध्ये गृहमंत्री अमित शहा हे उपचारांसाठी दाखल झाले व बरे होऊन घरी परतले. ज्या ‘एम्स’वर देशाच्या गृहमंत्र्यांचाच विश्वास आहे, त्या ‘एम्स’ने सुशांतप्रकरणी जो अहवाल दिला, तो अंध भक्त नाकारणार आहेत काय?’ असा सणसणीत टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.

“सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? असं शिवसेनेने म्हटलं आहे.

 

News English Summary: Actress Kangana Ranaut made a controversial statement about Mumbai Police, Mumbai and a new controversy had erupted. Eventually, the AIIMS report settled the controversy over Sushant’s case. However, after this report came to light, Shiv Sena has raised questions against those who criticized Maharashtra and Mumbai police in this case.

News English Title: Shivsena Sanjay Raut Sushant Singh Rajput Kangana Ranaut Gupteshwar Pandey Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x