17 April 2025 10:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मुंबई MMRDA मैदानाची क्षमता 1 लाख | भावना गवळी म्हणाल्या राज्यभरातून 10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार - ग्राउंड फॅक्ट रिपोर्ट

Shivsena Shinde Group

MMRDA Ground Capacity ​​| शिवाजी पार्कवर यावर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही गटांना मैदान न देण्याचा निर्णय रद्द करुन उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिकाही फेटाळून लावण्यात आली. दरम्यान आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे, असे म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांंनी यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मेळाव्याला येताना उत्साहात या, गुलाल उधळतं या, पण शिस्तीत या. कुठेही परंपरेला गालबोट लागून देवू नका. आपण आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत आहोत, असे म्हणतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्य सरकारवर कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे, ते ती पाळतील अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यावर एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे गटाने शिवाजी पार्क मैदान मिळावे. यासाठी आमच्या अगोदर अर्ज केला होता. त्यामुळं शिवाजीपार्क मैदान त्यांना मिळाले आहे. मात्र आमचाही दसरा मेळावा मुंबईतल्या बिकेसीवर होणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय.

तर अब्दुल सत्तार म्हणाले, आम्ही सरकार सोडून बाहेर गेलो. तेव्हा मुंबईत येऊन दाखवा, असं शिवसेनेनं म्हटलं. तेव्हा शिंदे साहेब म्हणतात ह्या पोकळ धमक्या आहेत. मी ऐकला जातो राज्यपाल यांची भेट घेतो. त्यांनी सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. शिवसेना शिंदे साहेबांची आहे. त्यांनाच धनुष्य बाण निशाणी मिळणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर 5 तारखेला दसरा मेळावा होणार आहे. ती इतिहासात न होणार सभा राहणार आहे. मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल, असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील :
तर यावर खासदार भावना गवळी म्हणाल्या, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आवाज दसरा मेळाव्यात घुमणार आहे. मुंबईमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य आहे. राज्यभरातून मुंबई येथील मेळाव्याला 10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील,” असे खासदार भावना गवळी यांनी सांगितलंय.

MMRDA मैदानाच्या क्षमतेचं वास्तव काय?
पुढील सहा वर्षे बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर एक लाखाहून अधिक लोकांना आकर्षित करणारा कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. कारण, पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे अशा कार्यक्रमांसाठी मैदानात उपलब्ध असलेली जागा एक तृतीयांशपर्यंत कमी करण्यात आली आहे. ओढून ताणून ही क्षमता दीड लाखांपर्यंत केल्यास आणि नियोजनात जराही चूक झाल्यास भीषण अपघात होऊ शकतो असं मेगा इव्हेन्ट कंपन्या सुद्धा सांगतात.

MMRDA मैदानावरील इव्हेंटचा आज पर्यंतच्या इतिहासात :
आज पर्यंतच्या इतिहासात ‘एमएमआरडीए’च्या मैदानावर काही मोठ्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कोल्डप्ले, बियॉन्स, रॉजर वॉटर्स, ब्रायन अ ॅडम्स, स्कॉर्पियन्स, मार्क नॉफलर, शकिरा, गन्स एन रोझेस, आयएनएक्स, आयएनएक्स, आयर्न मेडन, मायकेल लर्न्स टू रॉक अँड पिटबुल या मेगा इव्हेंटच्या समावेश होता.

MMRA

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena Shinde Group MP Bhawana Gawli statement on MMRDA Group check details 23 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena Shinde Group(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या