18 January 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या Business Idea | स्वतःचा उद्योग सुरु करा रतन टाटा यांच्यासोबत, 40 टक्क्यांपर्यंत मार्जिन मिळेल, महिना लाखोत कमाई होईल Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

गोध्राकांडानंतर भाजप नेत्यासाठी देखील रस्त्यावर न उतरणारे | आज अर्नबसाठी रस्त्यावर

Shivsena, Arnab Goswami, BJP Protest

मुंबई, ७ नोव्हेंबर: देशातील राजकीय विरोधकांचा एकेरी उल्लेख करुन विचित्र प्रकारे चिखलफेक करणे आणि मनुष्यवधाचा गुन्हा असणाऱ्या व्यक्तीसाठी जोरदार आंदोलन करणे यातून देश अराजकतेकडे जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा घणाघात आज सामनातून करण्यात आला आहे. सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंचा भारतीय जनता पक्षातील नेते आणि समर्थकांकडून अनेकदा एकेरी उल्लेख झाला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंवर राजकीय चिखलफेक करून त्यांच्या विरोधात मोठ्याप्रमाणावर अभियान सुरु करण्यात आली.

दरम्यान Republic TV’चे संपादक अर्णब गोस्वामींच्या (BJP Supporting Arnab Goswami) समर्थनाथ भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला हे जगातील आठव आश्चर्य असल्याची टीका सामनातून भारतीय जनता पक्षावर करण्यात आली आहे.

विशष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कारभाराची तुलना थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (US Presidential Election 2020) यांच्याशी करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना आपला पराभव समोर दिसू लागलाय. तरीही तद्दन खोट्या बातम्या पसरवून ते आपल्या पदाची नाचक्की करत आहेत. वारंवार मतमोजणी थांबवण्याचा कांगवा ते करतात तर कधी कोर्टात जाऊन निर्णयास स्थगिती आणतात. ट्रम्प यांच्या ‘रिपब्लिकन’ समर्थकांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ आणि हिंसाचार केलाय. हे वर्तन अमेरिकेच्या राष्ट्रीय प्रतिमेस धरुन नाही. तसेच वर्तन महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडून होत असल्याचे सामनातून म्हटलंय.

गुजरातमध्ये गोध्राकांड (Gujarat Godhra Kand) व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या कारवाया सुडाच्या होत्या असं त्यांनी वारंवार म्हटलंय पण तेव्हा भाजपने रस्त्यावर उतरुन कधी आंदोलन केली नाहीत. किंवा कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही अशी आठवण सामनाच्या अग्रलेखातून करुन देण्यात आली आहे.

 

News English Summary: It has been rumored in the match that the country is trying to move towards anarchy by throwing mud at the political opponents of the country and agitating hard for the person who has committed the crime of homicide. In the Sushant Singh Rajput suicide case, Chief Minister Uddhav Thackeray was often singled out by BJP leaders and supporters. In particular, a large-scale campaign was launched against Aditya Thackeray by throwing political mud at him.

News English Title: Shivsena slams BJP over protesting for Arnab Goswami News updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x