23 December 2024 9:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे शिवसेना अस्वस्थ: भाजपाची प्रतिक्रिया

BJP Leader Praveen Darekar, Raj Thackeray, Shivsena, HIndutva

मुंबई : महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

याबाबत बोलताना प्रविण दरेकर म्हणाले की, देशाच्या व्यवस्थेवर घुसखोरांचा ताण असल्याने जो कोणी देशभक्त आहे ते मनसेचा मोर्चाला सहभागी होऊ शकतात. बाळासाहेब ठाकरेंनी जी आक्रमक भूमिका पाकिस्तानी, बांग्लादेशीविरोधात घेतली होती. मात्र सत्तेच्या हवास्यापोटी शिवसेनेने सोयीस्कररित्या ही भूमिका बाजूला सारली आहे. शिवसैनिकांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मनसेच्या मोर्चाला मिळताना दिसत आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शिवसेनेची स्पेस मनसे भरुन काढतंय, त्यामुळेच शिवसेनेकडून अशाप्रकारे टीका होत आहे. मनसेने मोर्चाचं नेतृत्व केलं असलं तरी अनेक देशभक्त या मोर्चात सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे. देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, त्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन मोर्चात लोकांनी सहभाग घेत असतील असं भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे.

मात्र, मनसेचा हा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यानंतर आता मनसेने शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. “अजित पवार हे सरकार चालवत असून थोड्या दिवसांनी शिवसेना देखील चालवतील”, अशी खोचक टीका मनसे नेते अविनाश जाधव यांनी शिवसेनेवर केली आहे.

 

Web Title:  Shivsena upset after Raj Thackerays Pro Hindu stand says BJP Leader Praveen Darekar.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x