शिवसेनेने संभाजी भिडेंना सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे असं म्हटलं होतं: सविस्तर वृत्त
मुंबई : दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या सर्वानाच हे तुम्हाला मान्य आहे का असे सवाल केले. त्यानंतर भाजपने देखील याबाबत भूमिका जाहीर करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोणत्याही मावळ्याशी एखाद्याची तुलना करावी हे तर लांबच, पण त्यांच्या चरणांची धूळ व्हावी इतकी लायकी असलेलं तरी कोणी उरलं आहे का ? केवळ जातीय समीकरण आणि विशिष्ठ समाजाच्या मतांना डोंळ्यासमोर ठेऊन, कोणत्याही व्यक्तीची तुलना महाराजांशी किंवा त्यांच्या मावळ्यांशी करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. तसाच प्रकार शिवसेनेने देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता.
सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची तुला थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी करण्यात आली होती. कारण त्यावेळी संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त दाव्याने त्यांच्यावर टीकेचा तुफान भडीमार झाला होता, त्यानंतर शिवसेनेने संभाजी भिडे हे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले होते. स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी कधी कोणाची जात बघितली नाही. परंतु सध्याच्या राजकारणाची एकूण गणितच जातीवर अवलंबून असल्याने असले केविलवाणे प्रयोग केले जात आहेत असंच म्हणावं लागेल.
नक्की ‘सामना’ मुखपत्रात काय म्हटलं होतं?
“हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले होते.
“भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.” असे म्हणत, ‘सामना’त पुढे म्हटले होते की, “कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.”
Web Title: Shivsena was compared to Sambhaji Bhide with Bajiprabhu Deshpande in Saamana Newspaper.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL