22 November 2024 7:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; रेल्वेत प्रचंड गर्दी; कर्मचाऱ्यांचा रेलरोको

Corona Virus, Social Distancing, Rail Roko

मुंबई, १ जून: कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांवर आज आंदोलन करण्याची वेळ आली. या कामगारांची ने-आण करण्यासाठी शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या रेल्वेत प्रचंड गर्दी होत असून चढायलाही जागा मिळत नसल्याने या कामगारांनी अखेर आज रेल्वे रोको केला. विद्याविहार येथे रुळावर उतरून या कामगारांनी रेल्वे रोको केल्याने रेल्वे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्यांना जाता यावं म्हणून शटल सुरु करण्यात आली. मात्र आता या शटलमध्येही गर्दी होऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगार असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी लॉकडाउनच्या काळातही काम सुरु ठेवलं आहे. लोकल सेवा पूर्णपणे बंद असल्याने कामगारांची ने आण करण्यासाठी शटल सेवा सुरु करण्यात आली. मात्र छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकातूनच ही शटल भरुन येत असल्याची तक्रार हे कर्मचारी करत आहेत. मधल्या स्टेशन्सवर कामगारांना या शटलमध्ये पाय ठेवण्यासही जागा नसते. त्यामुळे विद्याविहार या स्थानकात रेल रोको करण्यात आला. कामगारांच्या संतापाचा उद्रेक झाल्याच यामुळे पाहण्यास मिळालं.

 

News English Summary: It was time to protest against the railway workers who were working even during the Corona outbreak. A shuttle service has been launched to transport these workers. However, due to huge congestion on the train and lack of space to board, the workers finally blocked the train today.

News English Title: Social distancing violation rail Roko at Mumbai Vidyavihar News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x