23 February 2025 10:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

धनंजय मुंडे कोरोनामुक्त, डिस्चार्ज वेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले

Social Justice Minister Dhananjay Munde, Covid 19, defeated Corona, discharged

मुंबई, २२ जून : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील अकरा दिवसांपासून ते ब्रीचकँडी रुग्णालयात करोनाच्या आजारामुळे दाखल होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

धनंजय मुंडे यांना १२ जून रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांना श्वससानाचा त्रास जाणवत होता. तसेच, त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कोरोनाचे निदान होताच त्यांना ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे खासगी सचिव प्रशांत भामरे व जनसंपर्क अधिकारी प्रशांत जोशी यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अन्य चार कर्मचाऱ्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू करण्यात आले. भामरे, जोशी व दोन चालक यांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. आता केवळ एक अंगरक्षक व एक कुक हे दोघेच जण रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती ही सुधारत आहे.

 

News English Summary: Social Justice Minister Dhananjay Munde has successfully defeated Corona and has been discharged. For the past eleven days, he has been admitted to Breachcandy Hospital with coronary heart disease. He was discharged from the hospital today after his second test came negative two days ago.

News English Title: Social Justice Minister Dhananjay Munde has successfully defeated Corona and has been discharged News latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x