सुशांतच्या कुटुंबियांसाठी धावलेली लाखो फेक अकाउंट नाईक कुटुंबियांच्यावेळी हरवली
मुंबई, ४ नोव्हेंबर: बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक धक्कादायक वास्तव समोर येताना दिसत आहेत. देशातील सर्वोत्तम आणि जगात स्कॉटलंड यार्डशी पोलिसांशी तुलना करण्यात येणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर सुरुवातीला समाज माध्यमांवर संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. समाज माध्यमांनी एकप्रकारे मुंबई पोलिसांनाच तपासावरून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांचा उपयोग करण्यात आला होता. परंतु , सदर प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रचंड प्रमाणात बदनामी करण्यासाठी समाज माध्यमांवर फेक अकाऊंट ओपन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बदनाम करण्यासाठी समाज माध्यमांवर BOTS चा वापर केला गेला होता. समाज माध्यमांवर तब्बल दीड लाखांहून अधिक बनावट अकाऊंट तयार करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांनी दिली होती.
दुसरीकडे आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.
दरम्यान संपूर्ण विषय महाराष्ट्राने ऐकल्यावर समाज माध्यमांवर मराठी उद्योजक नाईक कुटुंबियांना मराठी नेटिझन्सचा पूर्ण पाठिंबा मिळताना दिसत, ज्याला अपवाद ठरत ठरत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे समर्थक. एकूण राज्यातील किंवा देशातील भाजपाला मराठी उद्योजक नाईक कुटुंबियांबद्दल कोणतीही आत्मीयता किंवा सहानुभूती असल्याचं दिसत नाही हे विशेष म्हणावे लागेल. त्यात सुशांत सिंगच्या कुटुंबियांसाठी कार्यरत झालेली समाज माध्यमांवरील फेक अकाउंट्स सध्या नाईक कुटुंबियांच्या बाबतीत हरवल्याचे चित्र समाज माध्यमांवर दिसत आहे.
News English Summary: After hearing the whole issue from Maharashtra, on social media, the Marathi entrepreneur Naik’s family seemed to be getting the full support of Marathi netizens, with the exception of Bharatiya Janata Party supporters. It has to be said that the BJP as a whole does not seem to have any sympathy or sympathy for the Marathi businessman Naik family. The fake accounts on social media working for Sushant Singh’s family are now missing in the case of Naik’s family.
News English Title: Social Media fake account working for Sushant Singh Rajput is lost somewhere News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय