22 January 2025 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त

Somatane Tolnaka, Demanding closure, Raj Thackeray

मुंबई, २२ फेब्रुवारी: जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमटणे-तळेगाव टोल नाक्यांवर मावळवासियांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्याचा फायदा MH 14 नंबरच्या गाड्या असलेल्यांना होणार आहे. मागील भेटीवेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडले होते. त्यानंतर भेटीतच राज ठाकरेंनी IRB चे अधिकारी विरेंद्र म्हैसकर यांना फोन लावत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली होती.

त्यानंतर म्हैसकर यांनी समस्या लवकरात लवकर सोडवतो असं राज ठाकरेंना सांगितले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिलं होतं, त्यानंतर काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी एकाच फोनवर सोडवल्याने मावळवासियांना आनंद झाला होता, त्यांनी पुण्याचे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि नेते बाळा नांदगावकर यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले, त्याचसोबत कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात असं कौतुकही या शिष्टमंडळातील सदस्य मिलिंद अच्युत यांनी केले.

 

News English Summary: The demand for closure of Somatane Tolnaka on the old Mumbai-Pune highway was made on behalf of the citizens there. For the past 15 years, locals have been demanding the closure of Tolanaka. However, the government had clarified that the contract could not be withdrawn as it was for 11 years. Representatives of some organizations and political parties in Pune had gone to Krishnakunj to meet MNS president Raj Thackeray on this issue.

News English Title: Somatane Tolnaka locals demanding the closure of Tolanaka help from Raj Thackeray news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x