5 November 2024 1:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

एस.एस.सी २०१८: दहावीचा निकाल ८ जूनला

मुंबई : उद्या म्हणजे ८ जूनला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर होणार आहे. तशी अधिकृत घोषणा बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे.

उद्या दुपारी १ वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून ऑनलाइन निकाल खालील वेबसाईट्स वर पाहता येतील.

विद्यार्थी आणि पालक खालील वेबसाइटवर निकाल पाहू शकतात;

www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org
www.maharashtraeducation.com
www.rediff.com/exams
http://maharashtra10.jagranjosh.com

निकाल कसा पाहता येईल त्याची माहिती खालीलप्रमाणे;

१. पहिल्यांदा तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा.
२. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
३. समजा तुमचा नंबर P९८७६५४ असा आहे आणि तुमच्या आईचं नाव वंदना आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P९८७६५४ हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये VAN असं लिहावं लागेल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x