22 February 2025 11:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

अर्णबसाठी आंदोलनं | भाजपा रिपब्लिकवर स्वतःची फुकट जाहिरात करुन घेतंय - कुणाल कामरा

Standup comedian Kunal Kamra, Arnab Goswami Arrest, BJP Protest

मुंबई, ६ नोव्हेंबर: स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने भारतीय जनता पक्षाच्या आंदोलनांची खिल्ली उडवली आहे. त्याला कारण ठरलं आहे ते अर्णब गोस्वामींची झालेली अटक आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सुरु झालेली आंदोलनं. समाज माध्यमांवर पोस्ट करत त्याने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे.

यासंदर्भात ट्विट करताना कुणाल कामरा याने म्हटले आहे की, “अर्णब गोस्वामी यांना अटक होताच त्यांचे समर्थक भाजपा आणि एबीवीपीचे झेंडे घेऊन रिपब्लिक वृत्तवाहिनीवर येऊ लागले. भाजपा रिपब्लिक टीव्हीवर स्वत:ची मोफत जाहिरात करुन घेत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन कुणालने उपरोधिक टोला लगावला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी लाक्षणिक उपोषण केले आहे. आज सकाळी आमदार राम कदम हे मुंबईत मंत्रालयाच्या गेटसमोरच्या फुटपाथवर आंदोलनासाठी बसले, त्यावेळी त्यांनी डोक्याला काळी पट्टी बांधून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध करत महाविकास आघाडी सरकारवर थेट दडपशाहीचा आरोप केला. मात्र काही वेळांनी स्थानिक पोलिसांनी आमदार राम कदम यांना ताब्यात घेतले.

 

News English Summary: In a tweet, Kunal Kamara said, “As soon as Arnab Goswami was arrested, his supporters started appearing on Republic News with BJP and ABVP flags. The BJP is advertising itself for free on Republic TV. ” By tweeting such content, Kunal has made a sarcastic remark. His tweet is currently catching everyone’s attention on social media.

News English Title: Standup comedian Kunal Kamra Comment On Arnab Goswami Arrest News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x