22 November 2024 1:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

सिडकोत २५०० कोटींचा घोटाळा; पारदर्शक 'चौकीदारांच्या' कारभारावर कॅगचा ठपका

CIDCO Land, Fadnavis Govt, CAG Report

मुंबई : सिडको घोटाळ्याप्रकरणी कॅगनं फडणवीस सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. या अहवालवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान या प्रकरणाची निवृत्त न्यायधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या सुनील प्रभूंनी केली आहे.

विरोधीपक्ष भाजपने यावर आक्षेप घेतला आहे. यावर बोलताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अजून कॅगचा अहवाल आमच्या हातात आलेला नाही. विधानसभेच्या पटलावरही असा अहवाल आलेला नाही. हा अहवाल खरा की खोटा हे मला माहिती नाही. मात्र, अशा पद्धतीने कुणी हा अहवाल बाहेर सांगत असेल, तर गोपनीयतेचा भंग होत आहे. मंत्री म्हणून आपण गोपनीयतेची शपथ घेतो. असं असतानाही तो अहवाल विधीमंडळात येत नाही, आमदारांना कळत नाही आणि माध्यमांपर्यंत पोहचत असेल तर तो हक्कभंग आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा देखील द्यावा लागेल. याला शिक्षाही होते.”

फडणवीस सरकारच्या काळात सिडकोमध्ये घोटाळा झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालानं ठेवला आहे. कॅगच्या अहवालाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चाही झाली असल्याची माहिती आहे. सिडकोत अडीच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं आहे, असं सूत्रांकडून कळालं आहे.

२५ वर्षांचे कॅगचे अहवाल पाहिले तर ४ कागद कमी आहेत म्हणून ठपका ठेवतात. त्या कागदांमधील माहिती त्यांना पोहचली नाही म्हणून ते ठपका ठेवतात. माहिती पोहचली की ठपका मागे घेतात. याचा अर्थ गैरव्यवहार झाला, भ्रष्टाचार झाला असा नाही. भाजप, शिवसेना आणि आरपीआय असं मित्रपक्षांचं युतीचं सरकार होतं, ते जनसेवेसाठी होतं. ते पारदर्शकतेने काम करणारं सरकार होतं. आम्हाला विश्वास आहे की आम्ही चूक करणारच नाही, असंही मुनगंटीवार यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या २४ एकर जमिनीच्या व्यवहारात मोठा घोटाळा केल्याचा आरोप फडणवीस सत्तेत असताना काँग्रेसनं केला होता. सिडकोच्या जमिनीची किंमत १,७६७ कोटी रुपये असताना ती अवघ्या ३ कोटी रुपयांना बांधकाम व्यावसायिक मनीष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकली असल्याचा दावा देखील काँग्रेसनं केला होता.

 

News English Summery: CAG reporthas been blamed for the Fadnavis government over the Cidco scandal. CAG has blamed the CIDCO scandal during the Fadnavis government. It is reported that the report was discussed in a cabinet meeting. Meanwhile, Shiv Sena’s Sunil Prabhu has demanded an inquiry into the matter by a retired judge. On the BJP’s behalf, Sudhir Mungantiwar has made it clear that he is ready to face any inquiry. The CAG has blamed the CIDCO scam during the Fadnavis government. Shiv Sena MLA Sunil Prabhu has demanded that the CAG report be investigated in court. The CAG report is also reported to have been discussed in the cabinet. The CAG report said that CIDCO was a scam worth Rs 2,500 crore.

 

Web Title: Story 2500 crore scam in CIDCO during Former Fadnavis Government CAG report.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x