22 November 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मुंबईत कोरोनामुळे ६८ वर्षीय परदेशी नागरिकाचा मृत्यू

Corona Crisis, Covid 19

मुंबई, २३ मार्च:  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीचे जे कोरोना विषाणूचे रुग्ण होते. त्यांचे निकटवर्तीयच नवे रुग्ण आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हा विषाणू समाजात पसरलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही त्यांनी केली आहे.

नवी मुंबईत राहणारा हा ६८ वर्षीय व्यक्ती फिलीपाइन्सचा आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचं मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं. या व्यक्तिचा करोनाचा प्राथमिक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याचा रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह आला होता. सुरुवातीला त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तिला दम्याचा आणि मधुमेहाचा त्रास होता. करोनाची लक्षणं आढळल्याने त्याला १३ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

News English Summery:  Despite the government’s diligent efforts to prevent the Corona virus infection, controlling it seems increasingly difficult. Prime Minister Narendra Modi on Sunday called for a ‘Janata curfew’ across the country. He also had a good response. Meanwhile, the number of coroners in the state has increased. The state has reported 15 new cases of corona virus on Sunday. So there is only one excitement. The 68-year-old man from Navi Mumbai is from the Philippines. He was taken to a private hospital for treatment. He died on Sunday night while undergoing treatment, the Municipal Health Department said. This man’s initial report of Corona was positive. After that his report was again negative. He was initially shifted from Kasturba Hospital to a private hospital. He died while undergoing treatment. This person suffered from asthma and diabetes. He was taken to the hospital on March 13 due to symptoms of coronas.

 

News English Title:  Story a 68 year old Philippines citizen initially tested positive for Covid 19 died News latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x