गरीब घरातील श्रीमंत मनाचे मुंबई पोलीस हवालदार; मुख्यमंत्री निधीला १० हजार रुपये
मुंबई, २ एप्रिल: मागील दोन दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यादरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. पुढील काही दिवसात मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढण्याची भीती आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून ५००० पेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत” असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सध्या राज्याच्या तिजोरीला हातभार लागावा म्हणून सर्वच थरातून मदतीचा ओघ मुख्यमंत्री निधीला होताना दिसत आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील डोंगरी येथे कार्यरत असलेले हेडकॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी कोरोनाविषाणू विरोधात लढण्यासाठी खारीचा वाटा म्हणून आपल्या बचतीतून मुख्यमंत्री निधीला १० हजारांची मदत केली आहे. डांगरे यांनी मदतीचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हाती सोपवला आहे. हेडकॉन्स्टेबल डांगरे यांच्या या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
जगभर पसरलेल्या #CoronaPandemic मुळे लोकांचे होणारे हाल बघून डोंग्री, येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी @OfficeofUT यांच्या मुख्यमंत्री निधीला ₹१०,००० योगदान केले. गृहमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनते तर्फे त्यांचं कौतुक केलं व आभार मानले.#WarOnCorona pic.twitter.com/J9fvt6ISfI
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 1, 2020
डांगरे यांचे हे कार्य कौतुकास्पद तर आहेच. शिवाय ते सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून पोलिस विभागही गेल्या १५ दिवसांपासून कार्यरत आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस विभाग कार्यरत आहे. आपले कर्तव्य बजावत असतानाही आर्थिक मदत देऊन डांगरे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
दरम्यान, विप्रो लि., विप्रो इंटरप्रायजेस आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन यांनी एकत्रित ११२५ रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक हिस्सा प्रेमजी फाऊंडेशनचा असेल. विप्रो लि. १०० कोटी, विप्रो इंटरप्रायजेस २५ कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
News English Summary: Meanwhile, the Chief Minister Nidhi is seeing a surge of help from all levels to support the state treasury. On this occasion, Head constable Sridarshan Bapusaheb Dangare, who is working at Dongri in Mumbai, has helped the Chief Minister Nidhi to save 10,000 rupees from his savings as part of a saline fight against coronary virus. Dangare has handed over the help check to Home Minister Anil Deshmukh. Chief Minister Uddhav Thackeray and Home Minister Anil Deshmukh praised the work of Head Constable Dangare. This work of Dangere is admirable. Moreover, it is an inspiration to all. Police department has been working with health workers shoulder to shoulder. The police department is working to tighten the lock down. Dangare has set a model by providing financial assistance while performing his duties.
News English Title: Story a Mumbai police head constable has donated Rupees 10000 CM Covid19 relief fund Corona virus News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH