शाळा १ लाख भरून मोकळ्या होतील, या कायद्याचा काहीच उपयोग नाही: फडणवीस
मुंबई: आज ‘मराठी भाषा दिन’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे. त्यानुसार राज्यात पहिली ते दहावी मराठी विषय सक्तीचा होणार आहे. मराठी भाषा सक्ती करण्याबाबतचं विधेयक विधानपरिषदत एकमतानं मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर विधानसभेत देखील सहमत झाला. दरम्यान आपल्यासाठी हा भाग्याचा क्षण असल्याचं यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या सर्व प्रकारच्या मंडळांच्या शाळांमध्ये पहिले ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याचे विधेयक मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात प्रथम एकमताने संमत करण्यात आले. या कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळेच्या प्रमुखांना एक लाख रुपये दंड ठोठावला जाईल. तसेच अशा शाळांची मान्यतादेखील काढून घेण्याची स्पष्ट तरतूद या विधेयकात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून होईल, असे सरकारने स्पष्ट केले. आयसीएसई, सीबीएसई, एनआयओएस, आयजीसीएसई, एमआयईबी, सीआयएसई, बॅकलोरिएट, आयबी, ओरिएंटल तसेच सर्व मंडळांच्या शाळांना हा कायदा लागू असेल, असे मंत्री देसाई म्हणाले.
मात्र यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आमचे सरकार असतानाच आम्ही या कायद्याचा मसुदा तयार केला होता. या कायद्यामध्ये दोन तरतूदी अशा आहेत की, या कायद्यातूव कोणालाही सुट देता येईल. यात जी शाळा नियमांचे पालन करणार नाही त्यांना १ लाख रूपयाचा दंड देण्याची तरतूद केली आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मुंबई सारख्या ठिकाणी एका एका शाळेची फी ५-१० लाख असते. त्यामुळे यापैकी कोणत्या शाळेला नियम पाळायचा नसल्यास ते १ लाख भरून रिकामे होतील. त्यामुळे ह्या कायद्याचा काही उपयोग होणार नाही. जर मराठी भाषेसंदर्भातले आक्षेप सरकारने माण्य केले नाही तर मात्र हा कायदा कुचकामी होईल. त्यामुळे शासनाने याचा विचार केला पाहिजे. अस मत त्यांनी यावेळी मांडले.
News English Summery: Today, the Legislative Assembly has unanimously passed a law to force Marathi language. This law was drafted while we were in government. There are two provisions in this law that can be exempted under this law. Such information has been given by former Chief Minister Devendra Fadnavis. In a place like Mumbai, the fees for a single school are 1-4 lakhs. Therefore, if any of these schools do not want to follow the rules, then they will be paying Rs. Therefore, this law will be of no use. If the government does not accept objections regarding Marathi language, then this law will be ineffective. Therefore, the government should consider it. He expressed his views at this time.
Web Title: Story act will not work opposition leader Devendra Fadnavis has mentioned the worry about the law.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो