15 January 2025 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी
x

आ. नितेश राणे यांच्यामुळे मुंबई पालिकेचं वास्तव समोर; रुग्णांच्या शेजारी मृतदेह

MLA Nitesh Rane, Sion Hospital Video, Corona Dead Bodies

मुंबई, ७ मे: सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नितेश राणेंनी (MLA Nitesh Rane) ट्विट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कोविड-१९ वॉर्डमधला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये चार मृतदेह दिसत असून त्याशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे मृतदेह काळ्या रंगाच्या प्लास्टिक बॅगमध्ये बांधण्यात आले आहेत. काही मृतदेहांवर कापड आणि ब्लँकेटदेखील टाकण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये काही डॉक्टर्स पीपीई किट परिधान करुन उपचार करत असल्याचं दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वॉर्डमध्ये चार मृतदेह असूनही वैद्यकीय कर्मचारी अतिशय सहजपणे आसपास वावरत आहेत.

दरम्यान, मुंबईच्या सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा व्हीडिओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंदर्भात माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे (ICMR) तक्रार केली आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी बुधवारी हा व्हीडिओ ट्विट केला होता.

“काल रात्रीपासून सायन रुग्णालयाकडून हा व्हिडीओ बनावट असल्याचं सांगण्यात येत होतं. परंतु आता त्यांनी यावर धक्कादायक उत्तर दिलं आहे. पालिका प्रशासनावर आणि आरोग्य विभागावर आता विश्वास राहिला नाही. जर परिस्थिती हाताळणं जमत नसेल तर पालिका आयुक्तांनी राजीनामा द्यावा,” असंही राणे यांनी नमूद केलं आहे.

 

News English Summary: A shocking video has surfaced of patients being treated at Sion Hospital next to the bodies. Some of the bodies were kept in a ward of the hospital. The video of a patient next to him undergoing treatment has gone viral.

News English Title: Story Bjp Leader Nitesh Rane Shares Video Sion Hospital Mumbai Doctors Treating Patients Near Bodies News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x