शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढली म्हणणारे आ. भातखळकर आज ? - सविस्तर वृत्त

मुंबई: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती विषयावरून भारतीय जनता पक्षातील आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सध्या मुंबईतील भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी २०१९ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा असाच मुद्दा उचलत आक्रमक पवित्र घेतला होता तेव्हा आमदार अतुल भातखळकर यांनी संतापजनक प्रतिक्रिया प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली होती.
फडणवीस सरकारच्या काळात याच विषयावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी वित्त आयोगाला दोषी ठरवत, राज्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीमुळेच वित्तीय तूट वाढल्याचा धक्कादायक दावा केला होता. तसेच फडणवीस सरकारची पाठराखण करताना भाजपच्या काळातच राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावा सुद्धा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केला होता.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे वित्तीय तूट वाढत गेली आणि त्यामुळेच राज्यावर आर्थिक हलाखिची वेळ ओढवली आह असं ते म्हंणाले होते. दरम्यान, मागील २०१८ मध्ये वित्तीय तुटीची स्थिती होती, परंतु आता (२०१९ मध्ये फडणवीसांच्या काळात) राज्याच्या महसुलात सुधारणा झाल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.
तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निष्कर्षांवर सुद्धा टीका करताना, वित्तीय आयोगाचे निष्कर्षच चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे मत व्यक्त करत एकप्रकारे वित्त आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत आणि फडणवीस सरकारची पाठराखण केली होती. आज तेच भाजप आमदार अतुल भातखळकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र करताना दिसत आहेत.
चलो आझाद मैदान…
राज्य सरकारच्या निष्क्रीयतेविरुध्द धरणे आंदोलन.
शेतकरी सोडले वाऱ्यावर; महिलांवर वाढते अत्याचार! ना कर्जमाफी, ना मुक्ती! अवकाळीग्रस्तांना दमडीही नाही ! जलयुक्त शिवार, मेट्रो कारशेड सारख्या लोकोपयोगी कामांना स्थगिती देणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात धरणे.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 25, 2020
शेतकऱ्यांवर अन्याय,
आणि महिलांवर वाढते अत्याचार आणि महाभकास आघाडीच्या भोंगळ कारभारा विरोधात विरोधीपक्ष नेते @Dev_Fadnavis
यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपाचे धरणे आंदोलन.…#BudgetSession— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 25, 2020
News English Summery: Farmers are seeing the aggressiveness of the Bharatiya Janata Party MLA from the entire debt relief issue. At present, BJP MLA Atul Bhatkhalkar in Mumbai had taken up such an aggressive sacrilegious issue during the Fadnavis government in 2019 when MLA Atul Bhatkhalkar had given angry response while interacting with the media.
Web Title: Story BJP MLA Atul Bhatkalkar Stand over farmers loan during Fadnavis government.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE