21 November 2024 8:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अब की बार बाप-बेटे की सरकार; सुधीर मुनगंटीवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

BJP Protest against MahaVikasAghadi, Azad Maidan Mumbai, BJP Leader Sudhir Mungantiwar

मुंबई: भारतीय जनता पक्षातर्फे आज महाविकास आघाडी सरकारविरोधात पहिल्यांदाच आंदोलन छेडण्यात आले आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन आंदोलन पुकारणार होते हे कालच स्पष्ट करण्यात आलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. या सर्व घटनांना निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारविरोधा आंदोलन पुकारल्या सांगण्यात येत होतं.

या आंदोलनात भाजपचे राज्यातील सगळे प्रमुख नेते उपस्थित होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी उपस्थित होते. दुपारी १२ ते ३ दरम्यान हे आंदोलन पार पडलं.

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, “एक नवा पैसाही शेतकऱ्याला दिलेला नाही. दोन महिन्यात फक्त १५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी ४०० महिने लागतील” असं गणित देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.

या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी भाषण करताना, उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. अब की बार बाप-बेटे की सरकार, अब की बार स्थगिती सरकार, अशी टीका केली. महिला सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल त्यांनी केला.

 

News English Summery: This is the first time the Bharatiya Janata Party has staged a protest against the development-led government. It was made clear yesterday that BJP workers were going to call on the streets to protest. Farmers have been tricked by the Shivsena-Congress-NCP-Congress alliance government by Bharatiya Janata Party leaders. BJP leaders have alleged that there was an increase in incidents of torture against women during this government. All these developments were called to protest agitation against the government.

 

Web Title: Story BJP MLS Sudhir Mungantiwar attacks CM Uddhav Thackeray and Mahavikas Aghadi government in Azad Maidan Mumbai.

हॅशटॅग्स

#Sudhir Mungantiwar(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x