फडणवीस सरकारच्या सिडकोतील 'पारदर्शक' कारभारावर कॅगचे ताशेरे
मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सिडकोमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील कॅगचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. कॅगच्या अहवालामध्ये फडणवीसांच्या काळात झालेल्या सिडकोच्या २ हजार कोटींच्या कामावर ताशेरे ओढण्यात आले आहेत. या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवण्यात आला आहे.
फडणवीस सरकारच्या कालावधीत सिडकोबाबतच्या काही प्रकरणावरून कॅगने ताशेरे ओढले. याबाबत काही दिवसांपूर्वी कॅबिनेट बैठकीत झाल्याची माहिती समोर आली होती. कॅबिनेटमध्ये कॅगचा अहवाल सादर करण्यात आल्याचं बोललं गेलं. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कॅगच्या अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमितता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विमानतळाच्या कामात १६ निविदांमध्ये अनियमितता असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकल्पांतील ५० कोटीपेक्षा जास्त कामांच्या १६ निविदा या राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य वर्तमानपत्रात जाहिरात न देताच बहाल करण्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
तसंच, ८९० कोटींची कामे कोणताही अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली. तब्बल ४३० कोटींच्या १० कंत्राटांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आले. या कामांमध्ये अस्तित्वात असलेल्या कंत्राटदारांना विविध कामांच्या जागेसाठी ६९.३८ कोटी मुल्याची अतिरिक्त कामे निविदा न मागवता प्रदान करण्यात आली. यामध्ये पारदर्शकता नव्हती, असे देखील या अहवालात म्हटले आहे.
कॅगच्या आज सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर विधानभवन परिसरात देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘कॅगच्या अहवालात एप्रिल २०१३ ते मार्च २०१८ पर्यंतच्या विविध कामांच्या अवलोकनाचा उल्लेख आहे. नवी मुंबई मेट्रो रेल, नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळ याच्या निविदांबाबतच्या काही बाबी कॅगने निदर्शनास आणल्या आहेत. नवी मुंबई मेट्रो रेल आणि नेरूळ-उरण रेल्वे प्रकल्पासंदर्भात ज्या काही बाबी निदर्शनास आणण्यात आल्या, त्यासंदर्भातील सर्व निविदा आणि निर्णय हे २०१४ च्या पूर्वीचे आहेत. त्यासंदर्भात सुद्धा आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१४ मधील निविदा किंवा सप्टेंबर २०१४ मध्ये अॅडव्हान्स यासंदर्भातील ते आक्षेप आहेत.
News English Summery: In the time of Devendra Fadnavis, CIDCO has been accused of gross misconduct. The CAG report was submitted in the Legislative Assembly by Deputy Chief Minister Ajit Pawar today. The CAG report says that Cedco’s 2000 crore work during Fadnavis has been dragged on. The report alleged irregularities at Navi Mumbai International Airport and Nerul-Uran Railway Project. Devendra Fadnavis was speaking to reporters in the Vidhan Bhavan area following the CAG report. Fadnavis said, “The CAG report mentions various works from April 2013 to March 2018. The CAG has pointed out some of the tenders of Navi Mumbai Metro Rail, Nerul-Uran Railway Project and Navi Mumbai Airport. All the tenders and decisions regarding the Navi Mumbai Metro Rail and Nerul-Uran Railway project have been made before 2014. Objections have been registered in that regard too. They are objections to the tender in August 2014 or the advance in September 2014.
Web News Title: Story CAG Report major irregularities in Maharashtra CIDCO projects during former CM Fadnavis government.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार