महिला सुरक्षेवरुन मुख्यमंत्र्यांची डबलढोलकी! कदमांना निवडणुकीत आशीर्वाद अन आता टीकास्त्र
मुंबई : “तुम्हाला जी मुलगी आवडली, ती पळवून आणा असं, सांगणारे राजकारणी आहेत, ते निवडून येतात. ते इथे आहेत. सैनिकांच्या पत्नीबद्दल बोलणारे इथे आहेत. मतांच्या राजकारणासाठी एवढे आपण आगतिक आहोत”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सुरक्षेवरुन विधानपरिषदेत विरोधकांवर हल्लाबोल केला.
“महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल, तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे. याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली, तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यांनी आज विधानपरिषदेत केलं.
वास्तविक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महिला सुरक्षेवरून भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आणि विशेष करून राम कदम यांना लक्ष करत असले तरी याच आमदार कदम यांना थेट मातोश्रीवर आदरतिथ्य करून विजयी होण्याचे आशीवार्द दिले होते. स्वतः आमदार राम कदम यांनी त्याबाबत समाज माध्यमांवर माहित दिली होती. त्यामुळे तेव्हा उद्धव ठाकरेंना महिला सुरक्षा महत्वाची वाटली नाही का असा प्रश्न उपस्थित होतं आहे. त्यामुळे जस जसा महिला दिन जवळ येत आहे, तसतसं राजकीय नेत्यांची एका दिवसापूर्तीचं महिला सुरक्षेचं गांभीर्य उफाळून येताना दिसत आहे.
मुंबईतील दहीहंडी उत्सवात लग्नासाठी मुलगी आवडली असेल तर मला सांगा, मी पळवून आणणार आणि तुम्हाला देणार असं धक्कादायक आणि संतापजनक वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार राम कदम यांना मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी आशीर्वाद दिल्याचं ट्विट स्वतः राम कदम यांनी केलं होतं. विशेष म्हणजे त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात शिवसेनेने महिला सक्षमीकरणाचा विषय देखील घेतला होता, मात्र आजच्या विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या विधानांवरून त्यांना त्यावेळी यासर्व गंभीर विषयांचा विसर पडला होता असंच म्हणावं लागेल.
News English Summery: “There are politicians who say you want to run away, the girl you like, they get elected. They are here. Here are the speakers talking about the soldier’s wife. Uddhav Thackeray attacked the opposition in the Legislative Assembly from the security of women, saying that we are so agitated for votes politics. “If women oppression is to be curbed, there is a need to create a cultured society. The Chief Minister appealed to the Legislative Council today that it would only be empowering women if everyone started it from her home. In fact, today, Chief Minister Uddhav Thackeray is paying attention to the MLAs of Bharatiya Janata Party and especially Ram Kadam from women safety, but the same MLA Kadam was blessed at home Matoshree. MLA Ram Kadam himself informed about this on social media. Therefore, the question arises as to why Uddhav Thackeray did not consider women’s safety important. Therefore, as the Women’s Day is approaching, the seriousness of the security of women is being diminished by the one-day supply of political leaders.
Web News Title: Story Chief Minister Uddhav Thackeray at Vidhan Parishad speak about women security and BJP MLA Ram Kadam.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC