3 December 2024 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या; मुख्यमंत्र्यांची विनंती आणि इशारा देखील

CM Uddhav Thackeray, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शर्थीचे प्रयत्न करत असूनही यावर नियंत्रण मिळवणे दिवसेंदिवस कठीण जाताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. राज्यात रविवारी कोरोना विषाणूचे १५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने देखील लोकांना गंभीर इशारा दिला आहे. ट्विट करताना मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटलं आहे की, “कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावले आहे त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहने आणून गर्दी करून कायदा मोडू नका.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांनी शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीचे जे कोरोना विषाणूचे रुग्ण होते. त्यांचे निकटवर्तीयच नवे रुग्ण आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. हा विषाणू समाजात पसरलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन ही त्यांनी केली आहे.

 

News English Summery:  Despite the government’s diligent efforts to prevent the Corona virus infection, controlling it seems increasingly difficult. Prime Minister Narendra Modi on Sunday called for a ‘Janata curfew’ across the country. He also had a good response. Meanwhile, the number of coroners in the state has increased. The state has reported 15 new cases of corona virus on Sunday. So there is only one excitement. Meanwhile, the Chief Minister’s Office has also given serious warning to the people. In the tweet, the Chief Minister’s office said, “Take the fight against Corona seriously. Don’t play against yourself and others’ health. The 144 clause is imposed so that only essential services will continue.

 

News English Title:  Story Chief Minister Uddhav Thackeray made alert to Peoples over Corona Crisis issue News Latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x