22 January 2025 6:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मुस्लिम आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांचा 'युटर्न'; भाजपकडून पोलखोल सामना

Shivsena, Saamana Newspaper, CM Uddhav Thackeray

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देणार अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेवरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मुस्लीम आरक्षणाला विरोध असेल तर उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं होतं. तर फडणवीस यांच्या या आव्हानाला जितेंद्र आव्हाड यांनी सणसणीत उत्तर दिलं होतं.

वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेसाठी महाविकास आघाडी स्थापन करून एकत्रित आले खरे, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद वारंवार समोर येत आहेत. CAA, NPR, NRC मुद्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेत वेगवेगळी मतांतरं आहेत हे उघड झालं आहे, आता मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत उघड पद्धतीने मतभेद दिसत आहेत.

मात्र शैक्षणिक क्षेत्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने मागील आठवडय़ात केलेल्या घोषणेच्या परस्परविरोधी होती. तर धर्माच्या आधारावर मुस्लीम समाजास आरक्षण देण्यास ठाम विरोध दर्शवीत भाजपने या विषयावरून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

मात्र उद्धव ठाकरेंच्या मुस्लीम आरक्षण भूमिकेवरुन भाजपाने ट्विटरवर पोस्ट टाकत शिवसेनेला टोला लगावला आहे. या ट्विटसोबत सामनाचा वृत्तपत्राचा फोटो जोडण्यात आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा यू टर्न असं सांगत चार दिवसांपूर्वीच सामनामध्ये आलेली बातमी आणि आजची बातमी याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनेतेने काय घ्यायचा? राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारताच निर्णय घोषित करतात का? नक्की हे सरकार चालवतंय कोणं? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

 

News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray said yesterday that no decision has been made to give five per cent reservation to the Muslim community in the field of education. This role of Chief Minister was contradictory to the announcement made by the NCP last week. On the basis of religion, the BJP had strongly opposed the Shiv Sena, expressing strong opposition to reservation for the Muslim community. However, Shiv Sena has been criticized by the BJP by posting a post on Twitter over Uddhav Thackeray’s Muslim reservation role. A photo of the match newspaper has been attached to this tweet. In this, the news that came into the match four days ago, saying that the U-turn of Chief Minister Uddhav Thackeray and today’s news, what does the people of Maharashtra mean? Does the Minister of NCP announce the decision without asking the Chief Minister? Who exactly is running this government? Such questions have been raised.

 

Web News Title: Story Chief Minister Uddhav Thackerays U Turn exactly who running government BJP target Shivsena.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x