23 January 2025 12:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

युवा संवाद; महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात- शरद पवार

College Elections, NCP President Sharad Pawar

मुंबई : आज मुंबईत राष्ट्रवादीकडून युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तरुण पिढीसोबत संवाद साधला. युवा पिढीसोबत बोलण्याची संधी मिळाली याचा शरद पवार यांनी आनंद व्यक्त केला. तुमची पिढी आणि माझी पिढी यामध्ये किती फरक आहे, हे मला पाहायचे आहे. आता माझे वय ८० झाले आहे. मात्र प्रश्न विचारण्याची क्षमता कमी झाली नाही, असं म्हणत पवारांनी त्यांचा आमदारकीचा अनुभव तरुणांना सांगितला. अत्यंत दिलखुलास पद्धतीने पवारांनी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

दरम्यान, महाविद्यालयीन निवडणुका पुन्हा व्हाव्यात असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. देशाचं भविष्य ठरवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असला पाहिजे, या निवडणुका घेण्याबाबत सरकारनं पावलं उचलावीत असे आवाहनही त्यांनी सरकारला केले. सुरुवातीला ५ वर्ष अभ्यास करून सदनात गलो मग सत्तेतच संधी मिळाली, त्यानंतर विरोधीपक्ष नेते म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजकारणात चढ उतार येत असतात, पराभव झाला तर नाउमेद होऊ नये, पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज व्हावं असे त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले.

“मी २२ फेब्रुवारीलाच पहिली निवडणूक जिंकली होती. पूर्वीच्या कालखंडात यात खूप अभ्यास करावा लागायचा. यानंतर पक्षनेत्याची जबाबदारी अंगावर पडली.” “चढत्या क्रमाने जरी वर गेलात, यशस्वी झालात तरी देखील पाय जमिनीवर हवेत. एकंदर परिस्थिती लक्षात घ्यायची. कधीही ना उमेद व्हायचं नाही,” असा सल्लाही पवारांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

 

News English Summery: A youth interaction program was organized by NCP in Mumbai today. On the occasion, NCP President Sharad Pawar interacted with the younger generation. Sharad Pawar rejoiced that he had the opportunity to speak with the younger generation. I want to see the difference between your generation and my generation. I’m 80 years old now. However, Pawar said that his ability to ask questions has not diminished. Pawar answered the youth’s questions in a very generous way..

 

Web Title: Story College elections should be start again says NCP President Sharad Pawar.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x