31 January 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: BEL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, मजबूत तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAMOTORS IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँडसह डिटेल्स जाणून घ्या Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

मुंबई मरोळ पाइप लाइनमध्ये झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण

Corona Crisis, Covid19, Milkman Covid19, Marol Pipeline

मुंबई, १६ एप्रिल: धारावीमधील आणखी एका रहिवाशाचा बुधवारी करोनामुळे मृत्यू झाला असून धारावीतील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर आणखी पाच करोनाबाधित सापडले असून बाधितांची संख्या ६० झाली आहे. बुधवारी मृत्यू झालेली व्यक्ती मरकज कार्यक्रमाला हजेरी लावून परतली होती.

दुसरीकडे मुंबईच्या मरोळ पाइप लाइनमधील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. त्यामुळे आरोग्य आणि पालिका प्रशासनाची झोप उडाली असून मरोळ पाइपलाइन परिसरात मोठ्या प्रमाणावर तपासण्या करण्यात येत आहेत.

मरोळ पाइपलाइन येथील एका झोपडपट्टीतील दूधवाल्याला ताप आल्यानंतर घशात खवखव होऊ लागल्याने त्याची तपासणी करण्यात आली असता त्याचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या दूधवाल्याला करोनाची लागण झाल्याचं आढळून आल्यानंतर तो राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. तसेच त्याचे कुटुंबीय आणि तो राहत असलेल्या चाळीतील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या तपासण्याही सुरू आहेत.

तत्पूर्वी, दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये पिझ्झाची होम डिलिव्हरी करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर या भागातील ७२ कुटूंबियांना सध्या होम क्वारंटाईन (घरातच विलगीकरण) पद्धतीने राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

News English Summary: Corona infection has been reported in a slum in Mumbai’s Marol Pipeline. As a result, the health and municipal administration has fallen asleep and massive investigations are being conducted in the Marol Pipeline area.

News English Title: Story Corona a milkman has tested positive for Corona virus the man hails from Marol pipeline slum in Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x