कोरोना आपत्ती: आर्थिक मदतीसोबत, सरकारी इस्पितळात अत्यावश्यक साहित्याचं 'मनसे' वाटप
मुंबई, ०१ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून, गेल्या तीन दिवसांत ९३ कोटी पाच लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.
मंगळवारी प्रामुख्याने शिर्डी संस्थानने ५१ कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी ११ कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने एक कोटी रुपये दिले. दरम्यान, राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून आता तो ३२० वर पोहोचला आहे. मंगळवारी राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३०२ एवढी होती. परंतु बुधवारी तो आकडा वाढून ३२० वर पोहोचला. यामध्ये मुंबईत १६ आणि पुण्यात २ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत.
सदर परिस्थतीत सर्वच बाजूंनी सरकारकडे मदतीचा ओघ सुरूच आहे. मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री निधीला १० लाख दिले असून, स्थानिक पातळीवर देखील मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नियमांचे पालन करत सरकारला सर्वतोपरी मदत करत आहेत. तर शर्मिला राज ठाकरे यांनी मोजक्या कार्यकर्त्यांमार्फत मुंबईतील सरकारी हॉस्पिटल्समध्ये २५०० चादरी पाठवून वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील मदत केली आहे.
धन्यवाद @1nitinsardesai जी आणि @mnsadhikrut 🙏🏼 https://t.co/AGudmXYY9y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 1, 2020
News English Summary: Shirdi Sansthan gave Rs 51 crore, Maharashtra Industrial Development Corporation officials paid Rs 11 crore a day’s salary, Shree Swami Vivekananda Education Institute, Kolhapur one crore. Meanwhile, the number of coroners in the state has increased and now it has reached 320. The number of coroners in the state was 302 on Tuesday. But on Wednesday, that number increased to 320. Of these, 16 were found in Mumbai and 2 in Pune. In this situation, there is a wave of help from the government on all sides. Former MNS MLA Nitin Sardesai has given Rs 10 lakh to the Chief Minister’s Fund, and at the local level, MNS workers and office bearers are helping the government by following the rules. Sharmila Raj Thackeray has also helped medical staff by sending 2500 bed sheets to government hospitals in Mumbai through a handful of activists.
News English Title: Story Corona crisis MNS party helping hands News latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER