21 April 2025 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत; शिवसेनेचं टीकास्त्र

BJP Avadhut Wagh, Corona Crisis, Shivsena

मुंबई, ३१ मार्च: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.

भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटचं, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा भोगावी लागेलच’ असं उत्तर दिल्याने सोशल मीडियात अवधूत वाघ यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विनाकारण टीका केल्यामुळं इस्लामपूरमध्ये करोना फैलावला असं वक्तव्य करणारे भाजपरच्या प्रवक्त्यावर शिवसेनेनं कडाडून हल्ला चढवला आहे. ‘भाजपची सत्ता असलेल्या राज्यांतही करोना पसरत आहे. मोदींवर कुठलीही टीका न करणाऱ्या राज्यांत व शहरांतही करोना पसरत असेल तर तो मोदींच्या देवत्वाचा पराभव आहे का,’ असा सवाल शिवसेनेनं मोदीभक्तांना केला आहे.

काय म्हटलं आहे सामनाने;

स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत. इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपवाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील.

देशभरात कोरोनाचा हैदोस सुरू असताना राजकारणी लोक तोंडास येईल ते बोलत आहेत. ज्यांनी ज्यांनी मोदींवर टीका केली त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यांमध्ये करोना घुसू द्या व बळी जाऊ द्या असे भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावे. मोदींवर टीका करण्याची शिक्षा मृत्युदंडाच्या रूपाने मिळावी असेही बहुधा त्यांचे म्हणणे असावे.

देशातील वातावरण काय आहे आणि हे लोक काय पद्धतीने अकलेचे तारे तोडत आहेत? मोदी हे विष्णूचे तेरावे की चौदावे अवतार आहेत अशा प्रकारची मुक्ताफळे उधळणाऱ्यांनीच महाराष्ट्राला हा कोरोनाचा शाप दिला आहे, असे उद्या कोणी म्हटले तर?

 

News English Summary: BJP spokesman Avadhut Wagh has reacted angrily to Minister Jayant Patil’s remarks. What has happened in Islampur is bad, but if you criticize Modi for no reason, you will have to suffer punishment. ‘ Meanwhile, the Shiv Sena has strongly attacked the BJP spokesperson, saying that the Prime Minister Narendra Modi was irreverently criticized for spreading Karona in Islampur. ‘Corona is spreading even in the BJP-ruled states. Shiv Sena has asked the Modi devotees if they are spreading Karuna in states and cities which do not criticize Modi.

 

News English Title: Story corona crisis politics Shivsena lashes out at BJP over Avadhut Wagh comment on Islampur News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या