22 January 2025 5:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल
x

महाविकास आघाडी सरकार संत गाडगेबाबांच्या 'दशसुत्री' प्रमाणे काम करेल: मुख्यमंत्री

Corona Virus, CM Uddhav Thackeray

मुंबई, १२ मार्च: संत गाडगेबाबा यांच्या ‘दशसुत्री’ शिकवणीनुसार महाविकास आघाडीचे सरकार काम करेल, हा विश्वास दर्शविणाऱ्या फलकाचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज मंत्रालय येथे केले. दरम्यान आज मंत्रालयात कोरोनाच्या संदर्भातील महत्वाची बैठक पार पडली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री राजेंद्र पाटील, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, रेल्वे, बंदरे, विमानतळ प्राधिकरण, खासगी रुग्णालयातील विशेषज्ञ, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधून पुणे येथील परिस्थितीबाबत माहिती घेतली. पुणे येथील नायडू रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा असून गरज पडल्यास पिंपरी चिंचवड येथील नवीन रुग्णालयात देखील विलगीकरणाची सुविधा करावी. व्हेंटीलेटर्सची उपलब्धता ठेवावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात करोनाचे ११ रुग्ण आढळल्याने राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही गुंडाळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारपर्यंतच घेण्याचा प्रस्ताव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे विधिमंडळाचं कामकाज शनिवारपर्यंतच चालणार आहे.

 

News English Summery: Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray on Monday unveiled a panel demonstrating the belief that the development government will work in accordance with the teaching of Sant Gadgebaba. Meanwhile, an important meeting regarding Corona was held in the ministry today. Chief Minister Thackeray was speaking at a meeting in Legislative Assembly to review the ongoing measures in the wake of Corona. Deputy Chief Minister Ajit Pawar, Health Minister Rajesh Tope, Food and Drug Administration Minister Dr. Rajendra Shingne, Environment Minister Aditya Thackeray, Minister of State Rajendra Patil, former Health Minister Dr. Deepak Sawant, railway, ports, airport authorities, specialists in the hospital, officials from various departments were present. During this time, the Chief Minister, Deputy Chief Minister interacted with the Pune Divisional Commissioner, Collector and informed about the situation in Pune through video conferencing. Naidu Hospital in Pune has separation facilities and if need be, new hospital at Pimpri Chinchwad should also be separated. The Chief Minister said that ventilators should be available.

 

Web News Title: Story Corona effect Maharashtra Mahavikas Aghadi important meet held at Mantralaya.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x