22 November 2024 2:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आनंद वार्ता! आईसह ३ दिवसांच्या नवजात बाळाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Covid 19, Corona Crisis, Baby Boy Report Negative

मुंबई, २ एप्रिल: मुंबईत तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं. मात्र बाळाची आई आणि बाळ या दोघांचे चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महिलेला प्रसतुकळा सुरु झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयातील कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आल्यानं महिलेला विषाणूची बाधा झाल्याचं समोर आलं आहे, दरम्यान, या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचे चाचणी अहवाल देखील पॉझिटिव्ह आले होते.

सध्या पीडित व्यक्तीची कोरोनाबाधित पत्नी आणि बाळ कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, पीडित व्यक्ती क्वारंटाइन वॉर्डमध्ये आहे. ‘कस्तुरबामध्ये माझ्या पत्नीला व मुलाला चांगले उपचार मिळत आहेत. मात्र, माझ्या बाळाची अधिक काळजी घ्यावी,’ असं आवाहन पीडित व्यक्तीनं केलं होते.

बाळाच्या आईला २६ मार्च रोजी प्रसुतीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र महिलेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर ३० मार्च रोजी तिचे स्त्राव नमुने घेण्यात आले. ३१ मार्चला महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर महिला आणि तिच्या बाळाला पुढील उपचारांसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र आता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

 

News English Summary: In Mumbai, a three-day-old baby was found to be infected with corona virus. However, test reports for both the baby’s mother and the baby have come out negative. The woman was rushed to the hospital due to the onset of adversity. The woman has been exposed to the virus after being exposed to corona virus disorders at this hospital, meanwhile, some of the hospital staff’s test reports also came in positive.

 

News English Title: Story Corona virus Chembur mother and child corona report got negative Covid 19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x