राज्य मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावणाऱ्या मंत्र्याला कोरोनाची लागण; रिपोर्ट पॉझिटिव्ह
मुंबई, २२ एप्रिल: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे या मंत्र्याने सोमवारीच मंत्रालयामध्ये एका बैठकीला हजेरी लावल्याने खळबळ उडाली आहे. या मंत्र्याची तब्येत मंगळवारी काहीशी बिघडली होती. यामुळे त्यांच्यावर फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या मंत्र्याने सोमवारी मंत्रालयात बैठकीला हजेरी लावल्याने त्यांना भेटलेल्या अधिकारी, कार्यकर्त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत असं वृत्त आहे.
दरम्यान, बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांना अचानक खूप ताप आला आणि त्याचबरोबर श्वास घ्यायलादेखील त्रास होत होता. त्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण ज्यूपिटर हॉस्पिटलने मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिल्याचं समजतं.
आव्हाड हे सध्या मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कोव्हिड-19 ची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतरही जितेंद्र आव्हाड त्यांच्या मुंब्र-कळवा या मतदारसंघात फिरत होते. त्यांच्या आसपासच्या लोकांना कोव्हिड-19 ची लागण झाल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी १३ एप्रिलला घरी स्वत:ला १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करून घेतलं होतं.
त्यावेळी कोरोनाची चाचणी केली आहे आणि ती निगेटिव्ह आल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं. पण या क्वारंटाईन काळात आठव्या दिवशीच त्यांना ताप आणि श्वासाचा त्रास जाणवू लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना तसंच आव्हाड यांच्यासोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोव्हिड-19 झाल्याचं समोर आलं होतं.
News English Summary: According to the BBC, Jitendra Awhad suddenly developed a high fever on Tuesday night and was having difficulty breathing. He was then taken to Jupiter Hospital, Thane. But it is understood that Jupiter Hospital advised him to be taken to Fortis Hospital in Mulund. Awhad is currently undergoing treatment at Fortis Hospital in Mulund. They are said to be infected with Covid-19.
News English Title: Story corona virus Chief Minister Uddhav Thackreys minister got corona positive attended meeting Covid 19 News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC
- NBCC Share Price | मल्टिबॅगर एनबीसीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 30% पर्यंत कमाई होईल - NSE: NBCC
- ESIC Benefits | पगारदारांनो, हलक्यात घेऊ नका, ESIC अंतर्गत कर्मचाऱ्यांना मिळतात अनेक लाभ, डिटेल्स लक्षात ठेवा - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, 50% पर्यंत कमाई होईल, BUY रेटिंग - NSE: ASHOKLEY
- Edelweiss Mutual Fund | अजून काय हवं, महिना बचतीवर हा फंड 1.12 कोटी रुपये देईल, फायद्याची स्कीम सेव्ह करा - Marathi News
- Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Tata Steel Vs JSW Steel Share Price | पॉलिसी चेंज, टाटा स्टील आणि JWS स्टील शेअर्सला होणार फायदा- NSE: TATASTEEL
- Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर शेअर BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON