22 November 2024 10:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

मुंबई पोलिसांकडून वरळी आणि धारावीत ड्रोनद्वारे सूचना देण्यास सुरुवात

Covid19, Corona Crisis, Dharavi and Worli

मुंबई, १४ एप्रिल: १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळल्याने महाराष्ट्राची रुग्णसंख्या २४५५ इतकी झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.काल उशिरापर्यंत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २३३४ होती. त्यामध्ये १२१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या २४५५ झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंते भर घालणारीच ही बातमी ठरली आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.

दरम्यान, धारावीला बसलेली कोरोनाची मगरमिठी अद्याप सुटताना दिसत नाही. धारावीत आज पुन्हा ७ नवे रुग्ण आढळले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, तिसरा रुग्ण हा कोरोनाबाधित होता की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या ५५वर गेली असून मृतांचा आकडा ८वर गेला आहे.

त्यामुळे मुंबईतील दाट लोकवस्ती असेलेल्या धारावी आणि वरळी कोळीवाड्यांसारख्या भागांवर आता ड्रोनची करडी नजर असणार आहे. या भागांमध्ये मुंबई पोलिस ड्रोनला स्पीकर लावून त्याद्वारे नागरिकांना गर्दी करु नका, घरीच बसा अशा सूचना देणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरळी कोळीवाड्याची पाहणी करत या प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

गृहमंत्री अनिल देशमुखांनी सांगितले की, ‘मुंबईतील दाटलोकवस्ती असलेल्या धारावी, वरळी कोडीवाडा या सारख्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या भागात स्पीकर ड्रोनच्या माध्यमातून लोकांना सूचना देण्यात येणार आहे.’ कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता ड्रोनचा वापर मुंबई शरहातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात केला जात आहे. ५ ते ६ ड्रोन मुंबईत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Maharashtra has reduced the population to 2455, with 121 coronas-positive patients newly found. The Health Department of the Government of Maharashtra has given this information. It has increased to 121 patients. So the number is 2455. It has become news that has raised the concerns of Maharashtra. Mumbai, the capital of Maharashtra, has the highest number of Corona patients.

News English Title: Story Corona virus crisis Mumbai police have deployed drones for surveillance in Covid 19 Hotspot areas Dharavi and Worli in Mumbai News Latest Updates

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x