कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; लागण झालेल्यांची संख्या २६ वर

मुंबई, १४ मार्च : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची (COVID-१९) संख्या वाढली आहे. आता देशात सर्वाधिक कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि यवतमाळमध्ये नवे रुग्ण सापडल्याने राज्यातल्या बाधितांची संख्या २६ वर पोहोचली आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.
Maharashtra Health Minister Rajesh Tope: Total positive #Coronavirus cases in the state rise to 26. (file pic) pic.twitter.com/E74mAJIr1O
— ANI (@ANI) March 14, 2020
नागपूर येथे एका ४३ वर्षीय आयटी व्यावसायिकाला कोरोना विषाणूची लागण झालेली आहे. हा रुग्ण अमेरिकेचा दौरा करुन आलेला आहे. तर यवतमाळ येथे आढळून आलेले दोन्ही रुग्ण हे दुबईला जाऊन आले होते. या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे यवतमाळचे जिल्हाधिकार एम डी सिंग यांनी सांगितल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
MD Singh, Collector Yavatmal: Two persons have been tested positive for #Coronavirus in Yavatmal; both have travel history to Dubai. #Maharashtra
— ANI (@ANI) March 14, 2020
राज्यात पुढील आदेश येईपर्यंत सर्व शासकीय, व्यावसायीक, यात्रा, धार्मीक, क्रिडा विषयक कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले असून गांभीर्य ओळखून सर्वांनी साथरोग प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २६ इतकी झाली आहे. पुणे-पिंपरी चिंचवड-१०, मुंबई-५, नागपूर-४, यवतमाळ-२, ठाणे-१, कामोठे (रायगड)-१, नवी मुंबई-१, कल्याण-१ आणि अहमदनगर-१ या जिल्ह्यात मिळून २६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील सर्व १० रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
News English Summery: The number of corona virus affected (covid-19) in the state has increased. Now Maharashtra has the highest corona virus patients in the country. In Mumbai, Navi Mumbai and Yavatmal, the number of patients in the state has reached 26 as new patients are found. All schools have been closed as a precautionary measure in the context of Corona. This includes all public and private schools in the state. Health Minister Rajesh Tope said in the Legislative Assembly that all schools in the state would be closed by March 31. A 43-year-old IT businessman has been infected with Corona virus in Nagpur. This patient has visited the US. Both the patients found at Yavatmal had come to Dubai. Yavatmal District MD Singh has said that the report of the duo was positive.
News English Title: Story Corona Virus in Maharashtra there are 26 positive patients in the state says health Minister Rajesh Tope News Latest Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
Power Grid Share Price | पॉवर ग्रीड कंपनीचा मल्टिबॅगर शेअर 'पॉवर' दाखवणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: POWERGRID
-
HDFC Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेला बँकिंग शेअर, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या, पैशाने पैसा वाढवा - NSE: HDFC
-
Apollo Hospital Share Price | बापरे, या शेअरने दिला 53,301% रिटर्न, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: APOLLOHOSP
-
Adani Port Share Price | 525 टक्के परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, अदानी पोर्ट शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला - NSE: ADANIPORTS
-
Mahindra And Mahindra Share Price | 46 टक्के परतावा मिळेल, भक्कम कंपनी, यापूर्वी दिला 619 टक्के परतावा - NSE: M&M
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB