5 November 2024 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News
x

ही वेळ टीका, आरोप करण्याची नाही; शिवसेनेचं फडणवीसांवर टीकास्त्र

Corona Crisis, Lock Down, Devendra Fadnavis

मुंबई, ३० मार्च: सरकारच्या सूचना व लॉकडाऊनचे नियम धुडकावून रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ही वेळ वादविवादाची नाही. टीका, आरोप करण्याची नाही. हातात हात घालून राष्ट्र आणि महाराष्ट्र वाचवण्याची आहे. सरकारी पगार भाजपच्या कोषात जमा करणाऱ्यांना हे कोणी समजावयाचे,’ असा बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे.

“आमचा इतर सर्व विरोधी पक्षांशी चांगला संवाद आहे. या संकटकाळी त्यांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. प्रमुख विरोधी असलेल्यांनी मात्र मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही.” अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

राज्यातील जनतेची काळजी केवळ विरोधी पक्षाला आहे आणि सरकार केवळ दंडुके घेऊन फिरत आहे. अशा आशयाची विधाने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस करत आहेत. पण आधीच्या सरकारच्या कार्यकाळात पोलिसांचा केवळ गैरवापर सुरू होता. आज केवळ कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जात आहे. एका रुग्णामुळे १०० जणांना आणि १०० जणांमधून एक हजार जणांना कोरोनाची बाधा होणार असेल तर अशा लोकांच्या पार्श्वभागावर दंडुका हाणणे ही समाजसेवा आणि रुग्णसेवाच आहे, असे सामनाच्या या अग्रलेखात म्हटले आहे.

 

News English Summary: Shivsena has strongly attacked opposition leader Devendra Fadnavis, criticizing the policemen who have taken to the streets, defying the government’s instructions and lock down rules. ‘This is not a time for debate. Not to criticize, accuse. We have to save the nation and Maharashtra by going hand in hand. Shivsena has questioned who should explain this to government depositors in BJP funds. “We have good communication with all the other opposition parties. We are getting good support during this crisis. Those who are the major opposition have also resorted to such important matters as the Chief Minister’s Relief Fund. Such remarks have been made from the match.

 

News English Title: Story corona virus lock down BJP for not being serious shivsena Saamana article Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x