23 January 2025 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

माध्यमांची मुस्कटदाबी, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती; भाजपचा आरोप

Lockdown, Devendra Fadnavis

मुंबई, २८ एप्रिल: राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असं निवेदन भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

एकीकडे भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली असतानाच महाविकासआघाडीचे नेते संध्याकाळी ६ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. दरम्यान, सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची सुद्धा मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचं जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितलं असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या संपादकांवर थेट एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी स्वत: राज्याच्या गृहमंत्र्यांनी पत्र पाठवून दिली. वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत असा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

काय प्रतिक्रिया दिली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी;

 

News English Summary: Movements are on the rise at the Raj Bhavan, the governor’s residence. Leader of Opposition Devendra Fadnavis along with BJP leaders visited Raj Bhavan and met the Governor. Stop the muscat pressure of the media and strangulation of expression, said the BJP leaders in a statement to the Governor. Along with Devendra Fadnavis, Vinod Tawde, Pravin Darekar, Ashish Shelar and Mangalprabhat Lodha were present.

News English Title: Story Corona virus Lockdown opposition Leader Devendra Fadnavis Criticize State Government News latest Updates.

 

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x