5 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून गरजूंना आम्ही मदत करत आहोत - सुप्रिया सुळे

MP Supriya Sule, Lockdown, Facebook Live

मुंबई, ४ मे: कौटुंबिक हिंसाचार करणं ही काही कौतुकाची किंवा मर्दानगीची गोष्ट नाही. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं ही प्रत्येक पुरुषाची नैतिक जबाबदारी असते. स्त्रियांचा आदर करण्याचा संस्कारच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असून त्याची आठवण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज व्यक्त केलं. खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.

यावेळी एका युजरने सुप्रिया सुळे यांनी फेसबुकमधून बाहेर या आणि फिल्डवर जा असं म्हटलं. त्यावर सुप्रिया सुळेंनी उत्तर देताना सांगितलं की, “फिल्डवर जाण्याची माझी खूप इच्छा आहे. मी नेहमी फिल्डवरच असते. आपण केलेलं काम हे उपलब्ध माहितीवरुन दिसंत फेसबुकवरुन नाही. सरकारने जे नियम, कायदे केले आहेत त्याप्रमाणे मला काम करावं लागतं. तुमची सूचना मला समजली. मलाही खूप इच्छा आहे”.

ज्या गरजू लोकांना मदत लागते त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून ती माहिती फेसबुकवरुन देत आहोत. काम करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणी मी ती पार पाडत आहे,” असंही यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर सुप्रिया सुळे यांनी युजरला अजून काही सूचना असतील तर त्यादेखील द्या असंही सांगितलं.

या राज्यातील प्रत्येक महिलेला तिला तिचा आधार नकोय, तर तिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे. तिला मान द्या… तिचा सन्मान करा… तिचं कौतुक करा… तिच्यावर प्रेम करा… तुम्ही जेवढं प्रेम कराल त्याच्या दसपटीने ती तुमच्यावर प्रेम करेल, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

 

News English Summary: Domestic violence is not a matter of admiration or masculinity. It is the moral responsibility of every man to protect his family. Chhatrapati Shivaji Maharaj has given us the rite of respect for women and everyone should remember it, said NCP leader MP Supriyatai Sule today.

News English Title: Story corona virus Lockdown NCP MP Supriya Sule Answer To Facebook User During Live News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x