राज्यात लॉकडाऊनची गरज नाही, पण पुढचे १५ दिवस महत्त्वाचे: मुख्यमंत्री
मुंबई, १६ मार्च : कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु. पण त्यासाठी आपल्याला राज्य सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खालील मुद्दे मांडले. pic.twitter.com/XHJuwLF5Um
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 16, 2020
सध्या तरी राज्यात लॉकडाऊनची गरज नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही, असं सांगतानाच कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. शाळा, कॉलेज, अम्यूसमेंट पार्क आणि मॉल बंद केले असले, तरी हॉटेल अजूनही सुरूच आहेत. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. तसंच धार्मिक ठिकाणी गर्दी करु नये आणि धार्मिक कार्यक्रमही टाळावे, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी सर्व धर्माच्या धर्मगुरूंना केली आहे.
याचबरोबर, परदेशातून जे काही लोक आले होते. त्यांची तपासणी सुरू आहे. केंद्र सरकारकडून जी यादी देण्यात आली होती. त्यानुसार चाचणी केली जात आहे. तसेच, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा आणि निवडणुका पुढे ढकलण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जेवढी खबरदारी आपण घेऊ, तेवढं हे संकट आपण दूर करू शकतो, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
News English Summery: Chief Minister Uddhav Thackeray has said that the next 15 days are important in the wake of the spread of the corona virus. Against the precaution, the Chief Minister has again appealed that the house should be avoided. Corona is a global crisis and we will overcome it. But for this we need to follow the instructions given by the state government. He interacted with the media in the wake of the growing outbreak of the Corona virus. Currently there is no need for lockdown in the state. Chief Minister Uddhav Thackeray urged that citizens should follow self-restraint to prevent corona while saying that lockdown will not be required if citizens follow self-sufficiency. Although schools, colleges, amusement parks and malls have been closed, hotels are still open. Citizens should avoid unnecessary travel. Similarly, Uddhav Thackeray urged religious leaders of all religions not to crowd in religious places and avoid religious programs.
News English Title: Story Covid 19 Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray on Corona Virus crisis.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON