भाजपाकडून चूक झाली, पण चुकीला माफी नाही...बरोबर ना मुख्यमंत्रीसाहेब
मुंबई, १३ मार्च: ‘हो आम्ही शिवसेनेला फसवलं, आमची चूक झाली’ या सुधीर मुनगुंटीवार यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत भाजपला चांगलेच चिमटे काढले. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुधीर मुनगुंटीवार म्हणतात चूक झाली, चूक झाली पण आता चुकीला माफी नाही, हे वक्तव्य करताना बाजूला बसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे अजित पवारांनी कटाक्ष टाकला, त्यावर मानेने नकार देत उद्धव ठाकरे यांनीही चुकीला माफी नसल्याचं सुचित केलं.
राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आठवड्यात काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हा मुद्दा पकडून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्याची आठवण करून दिली. त्यावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
ते म्हणाले, मी कधी लपून-छपून काही करत नाही. जे काही असेल ते उघडपणे करतो. त्यावेळी तुमच्याकडे उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. ज्योतिरादित्य शिंदेसारखे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाकडेच लक्ष द्या. काही जण सभागृहात दिसत नाहीत. त्यांच्याकडे बघा, अशा स्वरुपाचे उत्तर अजित पवार यांनी दिले.
“राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची ५ वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा,” असा चिमटा अजित पवार यांनी यावेळी काढला.
News English Summery: Deputy Chief Minister Ajit Pawar slammed the BJP well in the Vidhan Sabha on the statement of Sudhir Mungutiwar saying, “Yes, we have cheated the Shiv Sena.” Speaking about this, Deputy Chief Minister Ajit Pawar said, “Sudhir Munguntywar says that mistake was made, mistake was made but now there is no apology for wrongdoing. Your government is going to be going to be .. That is, you have to say five years, if you do not say, the sitting MLAs will rise and leave, Ajit Pawar said to BJP. Ajit Pawar also advised the BJP that there should be no Jyotiraditya Scindia, and be careful not to go there. I do not hide what I want to do, now I am sitting here strong, Ajit Pawar told BJP.
Web News Title: Story Deputy Chief Miniter Ajit Pawar slams BJP party over Madhya Pradesh politics issue in Maharashtra.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय