रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग...
मुंबई, १३ मार्च: तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील तब्बल ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलमार्फत अर्ज केले होते. मात्र त्यानंतर सर्वकाही ठप्प झालं आणि त्यात निरनिराळ्या निवडणुका लागल्याने प्रक्रिया अधिकच लांबली होती. मात्र सरकारकडे फीच्या मार्फत तब्बल १३० कोटी पेक्षा अधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याच्या निर्णय घेतला आणि नव्याने तयारी सुरु केली होती.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार महाआयटी’तर्फे शासकीय महाभरतीसाठी सक्षम अशा खाजगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठी दोन दिवसात निविदा प्रसिद्ध केली जाणार असून १५ एप्रिलपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दरम्यान, सामान्य प्रशासनाकडून शासकीय महाभरती कशी राबवायची याबाबत परिपूर्ण परिपत्रक निघेल. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून मेगाभरतीला सुरुवात होईल. महाविकास आघाडी सरकारने खाजगी एजन्सीच्या मार्फत भरती करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
त्यावर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित करून राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील संशय व्यक्त केला होता.
सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण २ लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला २० एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला होता. त्यानंतर, त्यांनी उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी, “रोहित याबाबत तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही तसं सांग. यापुढे होणारी भरती प्रक्रिया ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितले.
राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीसंदर्भात काल मुख्यमंत्री श्री. @OfficeofUT साहेबांना भेटलो असता,
“रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग. यापुढील नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच होईल”,
अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलं. pic.twitter.com/EO7fz51M25
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 13, 2020
News English Summery: MLA Rohit Pawar was tweeting, “Some officials are misleading the way ministries are recruiting through private agencies in the state. He raised such a direct question in the state Law enforcement officials were also suspected that the vacancies of around 2 lakh employees are currently vacant in various departments of the state government, which starts on April 20, but MLA Rohit Pawar objected to the recruitment process, after which he met Uddhav Thackeray. At that time, “Don’t worry about Rohit and tell the kids too. The recruitment process will be carried out offline only, ” Uddhav Thackeray said. The then Fadnavis government had estimated the state’s position and decided to recruit mega 72 thousand posts. Around 34 lakh 82 thousand students from the state had applied through the Examination Portal to fulfill their dream of a government job. But then everything was halted and due to various elections, the process was much longer. However, the government has collected more than 130 crores through fees. Thereafter, the government, which led the newly formed development, decided to close the audit portal and had started preparations.
Web News Title: Story do not worry CM Uddhav Thackeray made it clear NCP MLA Rohit Pawar about Mega Bharati Mahapariksha Portal.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH